बातम्या
प्रगत भूक्षेत्रीय तंत्रज्ञानातील नोकरीच्या संधीवर शहाजी महाविद्यालयात व्याख्यान संपन्न
By nisha patil - 3/9/2026 5:11:08 PM
Share This News:
प्रगत भूक्षेत्रीय तंत्रज्ञानातील नोकरीच्या संधीवर शहाजी महाविद्यालयात व्याख्यान संपन्न
कोल्हापूर : शहाजी महाविद्यालयात‘Academic Linkage’ अंतर्गत भूगोल विभागाच्या वतीने ‘प्रगत भूक्षेत्रीय तंत्रज्ञानातील नोकरीच्या संधी’ (Job Opportunities in Advanced Geospetial Technology) या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानाचे प्रमुख वक्ते डॉ. अभिजीत पाटील (भूगोल अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांनी उत्कृष्ट PPT च्या माध्यमातून उपस्थित विद्यार्थ्यांना भूक्षेत्रीय तंत्रज्ञान अवगत करून निर्माण होणाऱ्या भूगोलातील करिअरच्या संधीबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. सुधीर पोवार (भूगोल अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांनी मोबाईल मधील ‘UTM Geo Map’ या App द्वारे विद्यार्थ्याना प्रात्यक्षिक ज्ञान दिले.
अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी भूषवले. त्यांनी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीकौशल्यपूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत असते त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळालेडॉ. डी. एल. काशिद-पाटील (भूगोल विभागप्रमुख) यांनी कार्यक्रमास उपस्थितांचे स्वागत आणि प्रस्तावना केली. या कार्यक्रमासाठी आयक्युएसीचे समन्वयक डॉ. मांडणीकर , सहसमन्वयक डॉ बलुगडे, न्यू कॉलेजच्या भूगोल विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. टिकेकर मॅडम प्रा. पोवार सर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.
डॉ. सौ. एन. डी. काशिद-पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. डॉ. शुभम तानाजी पाटील यांनी विद्यार्थ्याना व्याख्यानाचे छायाचित्रे काढणे व व्हिडिओ शूटिंग करण्यास मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. प्रा. ऐश्वर्या हिंगमिरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
प्रगत भूक्षेत्रीय तंत्रज्ञानातील नोकरीच्या संधीवर शहाजी महाविद्यालयात व्याख्यान संपन्न
|