बातम्या
वंदे मातरम ची जन्म कथा यावर शहाजी महाविद्यालयात व्याख्यान संपन्न
By nisha patil - 8/14/2026 9:00:56 PM
Share This News:
वंदे मातरम गीताचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान : प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण
वंदे मातरम ची जन्म कथा यावर शहाजी महाविद्यालयात व्याख्यान संपन्न
कोल्हापूर : वंदे मातरम गीताने स्वातंत्र्य सैनिकांना, क्रांतिकारकांना, स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्यांना मोठी ऊर्जा दिली. या गीताने देश एकसंघ बनवला. सबंध देशवासीयांच्यामध्ये स्वातंत्र्याची उर्मी या गीताने निर्माण केली. यामुळे या गीताचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास तज्ञ प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण यांनी केले. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात वंदे मातरम ची जन्म कथा या या विषयावरील व्याख्यानात ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर के शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.
प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण यांनी इसवी सन 1453 नंतर पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रज यांनी भारतामध्ये प्रवेश करून व्यापार केला व त्यानंतर राज्यकारभार केल्याचे सांगितले. ते म्हणाले की 140 वर्षे इंग्रजांनी या देशांमध्ये व्यापार केला. त्यानंतर 100 वर्ष व्यापार व राज्यकारभार केला.
त्यानंतर पूर्ण भारत इंग्रजी सत्तेचे अमलाखाली गेला. इंग्रजांनी संयमी आणि मुत्सधीपणाने संपूर्ण देश काबीज केला व अनेक अन्याय अत्याचार केले. पश्चिम बंगालमधील बंकिमचंद्र चटर्जी यांनी आनंदमठ या कादंबरीमध्ये वंदे मातरम हे गीत लिहिले. बंकिमचंद्र हे उपन्यायाधीश होते आणि ते चांगले कादंबरीकारही होते. काँग्रेसच्या 1885 च्या पहिल्या अधिवेशनात या हे गीत गाण्यात आले. लॉर्ड कर्झनच्या बंगाल फाळणीच्या वेळी संपूर्ण बंगालमध्ये हे गीत गाऊन इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष व्यक्त करण्यात आला. त्यानंतर काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सुरुवातीला रवींद्रनाथ टागोरांनी हे गीत गायले. या गीताने मंगल पांडे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना हसत हसत देशासाठी बलिदान करण्याची प्रेरणा दिली. संपूर्ण देशभर या गीताचे गुंजन झाले. अनेक प्रभात फेऱ्यांमधून हे गीत गायले जाऊ लागले. हे गीत राष्ट्रमंत्र झाला. ब्रिटिशांचा विरोध म्हणजे हे गीत ठरले.
प्राचार्य डॉ. आर के शानेदिवाण म्हणाले, वंदे मातरम म्हणजे भारताच्या अस्मितेचे आणि अभिमानाचे हे गीत आहे. जननी आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षा महान आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनांनमध्ये हे गीत गायले गेले. स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाप्रमाणेच या गीताचे साहित्यिक मूल्यही मोठे आहे. यातील भाषा सौंदर्य खूप सुंदर आहे. या गीताचे सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्य ही मोठे आहे.
राजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. डी. मांडणीकर यांनी स्वागत प्रास्ताविक केले. डॉ विजय देठे यांनी संयोजन केले.वैष्णवी सुतार हिने सूत्रसंचालन केले.आयुष मोरे यांनी आभार मानले.डॉ के एम देसाई, डॉ ए बी बलुगडे, डॉ डी के वळवी, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.राष्ट्रीय प्रतीकांची ओळख करून देणाऱ्या भिंती पत्रकाचे प्रदर्शन यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले.
वंदे मातरम ची जन्म कथा यावर शहाजी महाविद्यालयात व्याख्यान संपन्न
|