बातम्या

"चला टोपी घालूया " ; कोरगांवकर हायस्कूलचा आनंददायी उपक्रम                                        

Lets Wear a Cap  A delightful initiative by Korgaonkar High School


By nisha patil - 10/8/2026 3:19:08 PM
Share This News:



"चला टोपी घालूया " ; कोरगांवकर हायस्कूलचा आनंददायी उपक्रम                                        

कोल्हापूर  : आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित सदर बाजार येथील कोरगांवकर हायस्कूलमध्ये आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून टिकाऊ या उपक्रमांतर्गत कागदी गांधी टोप्या बनवून शनिवार आनंददायी केला .                              

सर्व विदयार्थ्यांना शाळेतील साहाय्यक शिक्षिका इंद्रायणी पाटील यांनी "चला टोपी घालूया"  या अंतर्गत विद्यार्थी विद्यार्थीनींची कार्यशाळा घेतली . या कार्यशाळेमध्ये त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना कागदाचा आधार घेऊन गांधी टोपी कशी बनवावी याचे प्रात्यक्षिक घेतले . राज्य शासनाच्या आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत कोरगांवकर हायस्कूलमध्ये दर शनिवारी शिक्षकांकडूनच आनंददायी शनिवार या उपक्रमाचे सुयोग्य सादरीकरण केले जाते .

गत शनिवारी सदाशिव -हाटवळ यांनी विद्यार्थ्यांना ध्यानधारणा आणि योगासनाद्वारे एकाग्रता कशी वाढवावी याचे प्रात्यक्षिक घेतले होते . यावेळी इंद्रायणी पाटील यांनी तयार करून घेतलेली कागदी गांधी टोपी उपस्थित शिक्षकांनी डोक्यावर घातली . या कार्यशाळेमध्ये मुख्याध्यापक संजय सौंदलगे, हेमलता पाटील, मीना बुचडे, राजेंद्र कुंभार, शीतल गणेशा चार्य, तृप्ती रावराणे, अभिलाषा माळी यांनी सहभाग घेतला . कोरगांवकर हायस्कूलच्या आनंददायी उपक्रमाचे शैक्षणिक वर्तुळात स्वागत केले जात असून महापालिकेच्या प्रशासन अधिकारी जयश्री जाधव यांनी या उपक्रमाबाबत मुख्याध्यापक संजय सौंदलगे आणि कोरगांवकर टिमचे कौतुक केले आहे .


"चला टोपी घालूया " ; कोरगांवकर हायस्कूलचा आनंददायी उपक्रम                                        
Total Views: 7