बातम्या

आंदोलन अंकुश संघटनेचे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 

Letter from the Movement Control Organization


By nisha patil - 1/9/2026 10:53:15 PM
Share This News:



पंचगंगा केंदाळमुक्त राहण्यासाठी आत्तापासून खबरदारी घ्यावी.

Dpdc मधून केंदाळ काढण्याची तरतूद करा.

आंदोलन अंकुश संघटनेचे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 
 

जयसिंगपूर.प्रातिनिधि आचिन हेरवाडे : पंचगंगा प्रदूषण मुक्ती उपाय योजना हे काम दाखवून खाजगी प्रोसेसमालकांना द्यायला सरकारकडे 600 कोटी आहेत तर मग नदीतले केंदाळ ग्रामपंचायतीने स्वताच्या खर्चाने काढावे म्हणून आपण आदेश का देता असा खडा सवाल जिल्हाधिकाऱ्यांना करत पंचगंगा प्रदूषणमुक्त ठेवायची सरकार ची जबाबदारी आहे ती यावर्षी आत्ता पासून पार पाडा. नदी केंदाळमुक्त राहण्यासाठी आत्ता पासून खबरदारीचे उपाय करावेत अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेने कोल्हापूर जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्याकडे केली.

आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वात काल शिष्टमंडळाने भेट घेऊन दिलेल्या निवेदनात पुढे म्हंटले आहे की कोल्हापूर  इचलकरंजी महापालिका आणि प्रोसेस धारकांचे प्रदूषित पाणी आजही काळ्या ओढ्यातून पंचगंगा नदीत जात आहे पण प्रदूषण मंडळ ठोस कारवाई करताना दिसत नाही. महापालिकेचे दोन्ही stp प्रकल्प बंद आहेत व प्रोसेसच्या पाण्यावर प्रक्रिया करणारा cetp प्रकल्प सुद्धा पाणी शुद्ध करून शेतात सोडण्याऐवजी नदीत सोडत आहे. चार महिन्यापूर्वी या विरोधात झालेल्या आंदोलना दरम्यान जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेश सुद्धा या दोन्ही घाटकांनी पाळले नाहीत त्यामुळे पुन्हा प्रदूषणाचा त्रास पंचगंगा काठावरील नागरिकांना होणार आहे. तो यावर्षी होऊ नये म्हणून तातडीने पाऊले उचलावीत म्हणून संघटनेने लेखी निवेदन देऊन मागणी केली व त्याप्रमाणे कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या शिष्ट मंडळात आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, जिल्हाध्यक्ष दिपक पाटील एकनाथ पाटील श्रीधर शिरहट्टी हनमंत पाटील शिवाजी पाटील अशोक खोत अमर पाटील उपस्थित होते.

महत्वाचे 

पंचगंगा प्रदूषणमुक्ती साठी स्टेक होल्डर कमिटी स्थापन करा
पंचगंगा प्रदूषणमुक्ती उपाय योजना राबवण्यासाठी म्हणून राज्य सरकार च्या विविध विभागाकडून इचलकरंजी येथील प्रोसेस इंडस्ट्री मधून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारणी साठी 600 कोटी रुपये दिले आहेत.खाजगी उद्योगाणा सरकार ने पैसे द्यायची गरज नाही पण लोकप्रतिनिधी अधिकारी आणि उद्योगपती यांच्या भ्रष्ट साखळीला पोसण्यासाठी हे पैसे सरकार देते पण पंचगंगा प्रदूषण मुक्त व्हावी म्हणून ज्या खरोखरच्या उपाय योजना आम्ही सुचवतोय त्या साध्या ऐकून सुद्धा घेतल्या जात नाही. प्रदूषनाचे चटके सोसणाऱ्या लोकांचे म्हणणे काय आहे हे माहिती करून घेण्यासाठी स्टेक होल्डर कमिटी करावी अशी मागणी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्याचे धनाजी चुडमुंगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.


आंदोलन अंकुश संघटनेचे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 
Total Views: 49