बातम्या
ग्रंथालय व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रम शहाजी महाविद्यालयात सुरू
By nisha patil - 4/9/2026 3:13:26 PM
Share This News:
ग्रंथालय व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रम शहाजी महाविद्यालयात सुरू
कोल्हापूर : दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाच्या अ जीवन अध्ययन व विस्तार विभागातील ग्रंथालय व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रमास सुरू करण्यास शिवाजी विद्यापीठाने परवानगी दिली आहे.
या अभ्यासक्रमासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण व ग्रंथपाल डॉ.पांडुरंग पाटील यांनी केले आहे.हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ग्रंथालय व्यवस्थेची आणि शालेय ग्रंथालये, महाविद्यालयीन ग्रंथालये, विद्यापीठ ग्रंथालये
सार्वजनिक ग्रंथालये यांची मूलभूत माहिती होणार असून ग्रंथालय क्षेत्रात करिअरच्या व अधिक शिक्षणाच्या संधी आहेत.
25 सप्टेंबर पर्यंत शहाजी महाविद्यालयातील शिवाजी ग्रंथालयात प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन सदर कोर्स सुरू होण्यासाठी मिळाले आहे.
दहावी पास झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला सदर अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. अधिक माहितीसाठी शहाजी महाविद्यालयातील शिवाजी ग्रंथालय येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रंथालय व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रम शहाजी महाविद्यालयात सुरू
|