बातम्या

*रोझरीत आजी आजोबा प्रेमळ  सन्मान दिन साजरा

Loving Grandparents Honor Day Celebrated at Rosary


By nisha patil - 4/8/2026 9:26:04 PM
Share This News:



*रोझरीत आजी आजोबा प्रेमळ  सन्मान दिन साजरा
 

आजरा(हसन तकीलदार):- आजी आजोबा आणि नातवंडामधील प्रेमळ नाते घट्ट करण्यासाठी ज्येष्ठांच्या अनमोल आणि जीवनापयोगी अनुभवांचा सन्मान करण्यासाठी तसेच विभक्त कुटुंब पद्धतीत हरवत चाललेली संस्कृती आणि कुटुंब पद्धतीत त्यांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून हा अनोखा दिवस साजरा केला जात आहे.
     

माझे आजी-आजोबा माझे आदर्श या मथळ्याखाली    रोझरीत आजी- आजोबा कृतज्ञता दिन म्हणून साजरा केला गेला असून या विशेष दिनातून विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या  आजी -आजोबा  यांच्याविषयी कृतज्ञता व आदराची भावना वाढीस लागावी तसेच संस्काराची वाढ व्हावी या उद्देशाने हा दिवस साजरा करून तो सार्थकी लागल्याचे समाधान लाभले अशी भावना व्यक्त करण्यात आली.या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने होऊन  शिक्षिका नीना नार्वेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत  केले.  
     

या कार्यक्रमास प्रमुख वक्त्या म्हणून डॉक्टर स्मिता अशोक फर्नांडिस उपस्थित होत्या त्या बोलताना म्हणाल्या की " विद्यार्थ्यांत संस्कार, मूल्ये आणि आदर निर्माण  होण्यास पालकांची भूमिका तर मोठी आहेच पण यासोबतच विद्यार्थ्यांत आपलेपणाची भावना,सुरक्षितता, आणि  जपणूक ही फक्त आजी आजोबा यांच्याच ठिकाणी होऊ शकते असे सांगत त्यांनी या दिनाचे महत्व अधोरेखित करून या दिनाच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले व आपल्या ओघवत्या शैलीतून भरभरून मार्गदर्शन केले.आजी आजोबा हेच नातवंडांचे पहिले मित्र असतात. नातवंडांच्या सहवासाने आजी आजोबांना पुन्हा बालपण मिळते. शाळेतील अनुभवासह आजी आजोबांचे अनुभव नातवंडांना जगण्याचे बळ देतात. एक उमेद देतात. त्यामुळेच शाळेत या दिनाचे महत्व वाढते. या दिनानिमित्त आजी आजोबांनाही सन्मान मिळत आहे.
       

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मॅनेजर मेल्विन पायस यांचे प्रोत्साहन ,फादर वोव्ल्विन फर्नांडिस,मुख्याध्यापक मनवेल बार्देस्कर,पर्यवेक्षक विजय केसरकर  जेष्ठ शिक्षिका एलिझाबेथ फर्नांडिस ,आजीआजोबा प्रतिनिधी म्हणून रामराव वंजारी यांची  उपस्थिती तर बालवाटिका संयोजक सर  स्टीफन डिसोझा यांनी उत्तम मार्गदर्शन करून मनोरंजनात्मक खेळ सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन पाहिले.कार्यक्रमात पालक वर्ग अर्थात आजी-आजोबा  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बालवाटीका शिक्षकवृंद अवेलिन  मंतेरो,रिझवाना काकतीकर, सना ताकिलदार,  नीना नार्वेकर तसेच सहकारी वर्ग सूर्यकांत सुतार, डेनिका बारदेस्कर ,सुनीता बारदेस्कर ,अश्विनी फर्नांडिस यांनी मेहनत घेतलीसूत्रसंचालन  अवेलिन  मंतेरो तर आभार  रिझवाना काकतीकर यांनी मानले.


*रोझरीत आजी आजोबा प्रेमळ  सन्मान दिन साजरा
Total Views: 37