बातम्या
शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना आमदार चंद्रदीप नरके यांची भावपूर्ण श्रद्धांजली
By nisha patil - 5/8/2026 12:38:18 PM
Share This News:
शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना आमदार चंद्रदीप नरके यांची भावपूर्ण श्रद्धांजली
कोल्हापूर, प्रतिनिधी : आज कसबा बावडा (कोल्हापूर) येथील यशवंत निवास येथे जाऊन आमदार चंद्रदीप नरके यांनी शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी आमदार नरके यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनातील अतुलनीय योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. "डॉ. डी. वाय. पाटील यांचे कार्य अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील. शिक्षण क्षेत्रात त्यांनी उभारलेले कार्य आणि समाजासाठी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील," असे त्यांनी सांगितले.
या अत्यंत दुःखद प्रसंगी आमदार चंद्रदीप नरके यांनी संपूर्ण पाटील कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. तसेच ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि कुटुंबीयांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, अशी प्रार्थना त्यांनी केली.
शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना आमदार चंद्रदीप नरके यांची भावपूर्ण श्रद्धांजली
|