बातम्या

पुणे येथे महाराणी येसुबाई जयंती संपन्न तर कारगिल विजय दिनाच्या स्मृतींचे स्मरण ;

Maharani Yesubai Jayanti celebrated in Pune


By nisha patil - 3/8/2026 1:05:38 PM
Share This News:



पुणे येथे महाराणी येसुबाई जयंती संपन्न तर कारगिल विजय दिनाच्या स्मृतींचे स्मरण ;

राज्यभरात ठिकठिकाणी येसुबाईंची ( राजाऊंची ) जयंती साजरी ; 

पुणे (प्रतिनिधी) : लोहगाव पुणे येथील राजेशिर्के यांच्या प्रसिद्ध साई डिफेन्स व पोलीस करिअर अकॅडमीच्या भरतीपूर्व प्रशिक्षण मैदानावर दि. २७ जुलै २०२६ रोजी महाराणी येसुबाईंच्या (राजमाता राजाऊंच्या ) जयंती सोहळ्या निमित्त तसेच कारगिल विजय स्मरण दिवसाचे (२६ जुलै) औचित्य साधत साई डिफेन्स व पोलिस प्रशिक्षण संस्थेच्या वतीने देशभक्तीसह शिव-शंभु-शाहू विचारांचा एकत्रित भव्य इतिहास जागर आयोजित करण्यात आला. 

जयंती निमित्त स्वराज्य निष्ठावंत श्रीमंत राजे पिलाजीराव शिर्के यांच्या राजकन्या, शिवस्नुषा, शाहूमाता राजाऊ, शंभुपत्नी, स्वराज्याच्या दुसऱ्या कुलमुखत्यार महाराणी येसुबाईंच्या प्रतिमेचे पुजन करुन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच कारगिल विजय दिवस स्मरणार्थ (२६ जुलै ) निमित्त देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या वीर जवानांच्या स्मृतींना उजाळा देत, प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद सैनिकांच्या अमर जवान स्मारकास मानवंदना देण्यात आली. 

यावेळी मान्यवर वक्त्यांनी भारतीय सैन्यातील वीर सैनिकांचा शौर्यदायी लढाऊ पराक्रम विशद केला. तर छत्रपतींनी निर्मिलेल्या रयतेच्या स्वराज्याचा वारसा अखंडित खंबीरपणे सांभाळणाऱ्या त्यागमूर्ती शंभुपत्नी महाराणी येसुबाईंचा तेजोमय इतिहासही प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यां समोर सविस्तर मांडला.यावेळी मान्यवरांनी अकॅडमीतील भावी सैनिकांना प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून "राष्ट्रप्रथम" हीच खरी देशसेवा याविषयी प्रेरणा दिली. समारोपा दरम्यान जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय राजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे आदि जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला.
 
संयुक्तिक कार्यक्रमा प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष शंभुसेना प्रमुख मा. दिपकराजे शिर्के साहेब, उपाध्यक्ष श्रीमंत राठोड, माजी सैनिक चंद्रकांत गायकवाड, प्रा. राहुल गुज्जर, ओम प्रभात सूर्यवंशी, मंगेश सरकाते, आप्पा बसर्गी, रुपाली सोनावणे आदी मान्यवरांसह आजी माजी सैनिक, शिव- शंभुभक्त, राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेश पदाधिकारी, शिक्षक स्टाफ, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.


पुणे येथे महाराणी येसुबाई जयंती संपन्न तर कारगिल विजय दिनाच्या स्मृतींचे स्मरण ;
Total Views: 57