बातम्या

*सुलगाव ता. आजरा येथे "माझा गट माझं कुटुंब "कार्यक्रम संपन्न

Majha Gat Majha Kutumb


By nisha patil - 8/25/2026 9:12:07 PM
Share This News:



*सुलगाव ता. आजरा येथे "माझा गट माझं कुटुंब "कार्यक्रम संपन्न
 

आजरा(हसन तकीलदार):-महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आजरा तालुका कृषी अधिकारी कार्यालय  व पाणी फाउंडेशन फार्मर कप 2026, यांच्या संयुक्त विद्यमाने आणि  "भावेश्वरी शेतकरी गट ,सुलगाव" यांच्या सहकार्याने महादेव मंदिर ,  सुलगाव तालुका आजरा येथे दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी "माझा गट माझं कुटुंब" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच  पांडुरंग खवरे उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत सदस्या  सौ. नंदिनी डोंगरे तसेच   पाणी फाउंडेशनचे फिल्ड ऑफिसर अभिजीत सुतार, पाणी फाउंडेशन च्या फिल्ड ऑफिसर संजना मदने , मंडळ कृषी अधिकारी उत्तुर मोहन फुले, उप कृषी अधिकारी प्रकाश पाटील,मेंटर तथा सहाय्यक कृषी अधिकारी सौ. मनिषा धनाजी पाटील ,मेंटर उमेद सोनाली परीट हे प्रमुख उपस्थित होते.

"माझा गट माझे कुटुंब" या कार्यक्रमाची सुरुवात गावामध्ये  भजन आणि दिंडी काढून करण्यात आली.सुलगाव गावातील माऊली भजनी मंडळांनी टाळ मृदंगाच्या गजरात भजन म्हणत"माझा गट माझं कुटुंब"  या  कार्यक्रमाच्या दिंडीमध्ये  शोभा वाढवली. त्यानंतर उपस्थित रणरागिणी शेतकरी गट बोलकेवाडी , अमृतेश्वर शेतकरी गट निंगुडगे, अन्नदाता शेतकरी गट सरंबळवाडी ,जगात भारी शेतकरी गट कासार कांडगाव, हरितक्रांती शेतकरी गट साळगाव , नवनिर्माण शेतकरी गट देवकांडगाव या सर्व गटांचे स्वागत  भावेश्वरी शेतकरी गटाच्या महिलांनी बनवलेले पुष्पगुच्छ तसेच मानाची आरती आणि पाद्य पूजन  फुलाचा वर्षाव करून करण्यात आले.भावेश्वरी शेतकरी गटाच्या महिलांनी स्वागत गीत सादर करत  मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमात पाणी फाउंडेशनचे फिल्ड ऑफिसर  अभिषेक सुतार व संजना मदने  यांनी सांघिक खेळाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. सांघिक खेळामध्ये सर्व गटातील सदस्यांनी  उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे नियोजन भावेश्वरी शेतकरी गट,सुलगाव मधील गटाच्या  अध्यक्षा सौ.विजया वर्देकर  आणि निमंत्रक विश्वास देसाई , निमंत्रक  ओंकार खवरे , निमंत्रक संजय  डोंगरे आणि गटातील सर्व सदस्य आणि सदस्यांचे सर्व कुटुंबीय यांनी केले. सूत्रसंचालन सौ. मनिषा धनाजी पाटील मेंटर पाणी फाउंडेशन तथा सहाय्यक कृषी अधिकारी यांनी केले.  प्रकाश पाटील उप कृषी अधिकारी यांनी आभार मानले.


*सुलगाव ता. आजरा येथे "माझा गट माझं कुटुंब "कार्यक्रम संपन्न
Total Views: 316