बातम्या
शिरोळ तहसील वर प्रस्तावित एमआयडीसी व आमदारांच्या कडून झालेल्या राष्ट्रध्वज अवमाना विरोधात मोठे आंदोलन
By nisha patil - 8/14/2026 8:53:50 PM
Share This News:
शिरोळ तहसील वर प्रस्तावित एमआयडीसी व आमदारांच्या कडून झालेल्या राष्ट्रध्वज अवमाना विरोधात मोठे आंदोलन
आंदोलनात शिरोळ तालुक्यातील सर्व समविचारी पक्ष संघटना माजी सैनिक शेतकरी पूरग्रस्त नागरिक महिला भगिनी यांनी मोठ्या संख्येने उद्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी सामील व्हावे अस आव्हान करण्यात येत आहे .
प्रस्तावित एमआयडीसी विरोधात 2023 पासून सैनिक टाकळी पंचक्रोशीतील गाव लढा देत आहेत इथली नैसर्गिक परिस्थिती वेगळी असताना सुद्धा औद्योगिकीकरणाचा घाट घातला जात आहे इथल्या गावची सैनिकी परंपरा बागायती शेती यांचा कुठेही विचार न करता .तसेच जवळ उद्योग उभारण्यासाठी आवश्यक असलेले दळणवळणाची साधने जसे रेल्वे विमानतळ बंदर हायवे नाही आहेत.
झालेली एमआयडीसीची प्रक्रिया ही सुद्धा बेकायदेशीर आहे. त्यामुळे प्रक्रिये बाबत शासन निर्णय झालेला असल्यामुळे वरिष्ठ स्तरावर बैठकीच लेखी पत्र मिळावं आणि तोपर्यंत प्रक्रिया थांबवावी.
यासाठी गेली दोन महिन्यांमध्ये तीन आंदोलन झाली पण प्रशासन किंवा स्थानिक आमदार यामध्ये लोकमत जाणून घ्यायला तयार नाहीत.
अस असताना स्थानिक आमदारांच्या कडून बैठकीला बोलवून माजी सैनिकांना मारहाण झाली राष्ट्रध्वजाचा अवमान केला .
या गोष्टीचा निषेध म्हणून उद्या शिरोळ तहसील समोरील ध्वजारोहण या आमदारांच्या हस्ते करून दिले जाणार नाही आणि प्रस्तावित एमआयडीसी विरोधात बैठकीचं लेखी पत्र मिळावं या मागणीसाठी शिरोळ तालुक्यातील सर्व समविचारी पक्ष संघटना माजी सैनिक शेतकरी पूरग्रस्त नागरिक महिला भगिनी यांनी मोठ्या संख्येने मोर्चास उपस्थित राहावे असा आवाहन आंदोलनाचे प्रमुख दीपक पाटील तसेच टाकळी जल जीवन बचाव कृती समिती माजी सैनिक संघटना यांच्या वतीने करण्यात येत आहे.
यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे राकेश जगदाळे संभाजी ब्रिगेडचे विकास पाटील काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुदर्शन कदम स्वराज्य क्रांती जन आंदोलनाचे आदम मुजावर सकल मराठा समाजाचे चंद्रकांत जाधव महेश जाधव शामराव पाटील नवनाथ पाटील उदय होगले सतीश सावंत महादेव काळे संभाजी माने शिवाजी पाटील प्रदीप पाटील इत्यादी उपस्थित होते.
शिरोळ तहसील वर प्रस्तावित एमआयडीसी व आमदारांच्या कडून झालेल्या राष्ट्रध्वज अवमाना विरोधात मोठे आंदोलन
|