बातम्या

 शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर बलिदान दिवस शहाजी महाविद्यालयात साजरा

Martyr Dr Narendra Dabholkar


By nisha patil - 8/21/2026 7:35:04 PM
Share This News:



शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा विवेकवाद आजही गरजेचा : डॉ. राम गुरुलिंग घुले

 शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर बलिदान दिवस शहाजी महाविद्यालयात साजरा

 कोल्हापूर  : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या बलिदानास 13 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त बलिदान दिवस साजरा करण्यात आला. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा विवेकवाद आज ही गरजेचा असून तो समाजाला, विद्यार्थ्यांना दिशादर्शक व अंधश्रद्धेपासून मुक्ती देणारा आहे. त्यामुळे तो आजही गरजेचा आहे. विवेकवाद, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनच माणसाला सत्यापर्यंत आणि गॅरेंटी पर्यंत पोहोचववू शकतो असे प्रतिपादन इस्लामपूर मधील मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. राम गुरुलिंग घुले यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण या व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विवेक वाहिनीमार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
   

श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले .प्रारंभिक डॉ.शिवाजी रायजादे यांनी स्वागत प्रास्ताविक करून उपक्रमाचा हेतू विशद केला.  डॉ. घुले म्हणाले, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्तेनंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम तिप्पट वाढले आहे. महाराष्ट्रभर आणि देशभर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या 3000 वर शाखा कार्यरत झाल्या आहेत. हजारो कार्यकर्ते डॉक्टर दाभोलकरांचा विचार पुढे नेत आहेत. हेच विचार टिकाऊ स्वरूपाचे आहेत. 
   

प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण म्हणाले, डॉक्टर दाभोळकरांच्या हत्तेनंतर त्यांच्यावर पहिले पुस्तक मी लिहिले व प्रसिद्ध केले.प्रतिगामी लोकांनी विचारांचा सामना विचाराने करायला पाहिजे होता . परंतु त्यांची हत्या केली. त्यांच्या हत्तेने त्यांचा विचार कमी झाला नाही तर तो समाजात वाढला आहे. विवेक वाद, विज्ञानवाद, विचार याच गोष्टी समाजाला पुढे घेऊन जातील. अंधश्रद्धा, बुवाबाजी, भोंदूगिरी गोरगरीबांचे आणि अज्ञानी लोकांचे शोषण करतात. विशेषतः मुले आणि स्त्रियांना अधिक लुबाडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विचार प्रवण राहावे, विवेक निष्ठा आणि विज्ञानवाद जोपासावा. तरच त्यांची प्रगती शक्य आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत बोलण आणि क्रुती एक असायला पाहिजे. त्याची  सुरुवात आपल्या घरापासून करायला पाहिजे .
   

संयोजन व आभार प्रा. प्रज्ञा भाटे यांनी केले. डॉ. आर. डी .मांडणीकर, डॉ.ए.बी.बलुगडे, डॉ.के.एम.देसाई, डॉ.डी.के.वळवी, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे सभागृहात हा  व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला.


 शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर बलिदान दिवस शहाजी महाविद्यालयात साजरा
Total Views: 6