बातम्या

*आजऱ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे स्मार्ट मीटर सक्ती विरोधात भव्य तिरडी मोर्चा

Massive funeral bier protest march in Ajara by Shiv Sena


By nisha patil - 8/21/2026 3:34:37 PM
Share This News:



*आजऱ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे स्मार्ट मीटर सक्ती विरोधात भव्य तिरडी मोर्चा

बहुजन मुक्ती पार्टी व कम्युनिस्ट पक्षानेही दिला पाठिंबा*

जाग्यावरच काही महत्वाच्या मगण्या मान्य करून घेऊन लेखी घेण्यात यश

*आजरा(हसन तकीलदार)-:आज शुक्रवार दि. 21/08/2026 रोजी वीज वितरण कंपनीमार्फत वीज ग्राहकांवर होणाऱ्या अनेक समस्या व तक्रारी घेऊन त्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य तिरडी मोर्चा काढण्यात आला होता. छत्रपती संभाजी चौकातून या भव्य मोर्चाची सुरवात झाली. स्मार्ट मीटरची तिरडी घेऊन वीज वितरण कंपनीच्या दारात ठेवण्यात आली आणि घोषणांनी परिसर दणाणून सोडला. वीज वितरण कंपनीच्या दारात मडके फोडण्यात आले.त्यानंतर संदीप पाटील (अतिरिक्त कार्यकारी अधिकारी, गडहिंग्लज) व अतुल पाटील(उपकार्यकारी अभियंता, आजरा) यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
   

यावेळी स्मार्ट मिटरची सक्ती आपण ग्राहकांवर करू नये ती तत्काळ थांबवा. ज्या ग्राहकांनी स्मार्ट मिटर बसविले नाही त्यांना आपल्या कार्यालयाकडून जाणून बुजून भरमसाठ वीज बिले पाठवता आणि दुरुस्त करण्यास गेल्यावर नवीन मिटर बसवा तरच बिल दुरुस्ती करून मिळेल असे सांगितले जाते. हे तात्काळ बंद करून ग्राहकाने रीडिंग घेऊन आल्यावर बिल दुरुस्ती करून मिळावे. स्मार्ट मिटर बसविलेल्या ग्राहकांना सुद्धा ज्यादा बिले येतात त्याची सुद्धा तात्काळ तपासणी करून बिल दुरुस्ती करून मिळावी.ज्या ग्राहकांना त्यांच्या संमतीशिवाय जुने मिटर बदलून नवीन स्मार्ट मिटर बसविले आहे. अशा ग्राहकांची तक्रार असेल त्यांना त्यांचे जुने मिटर बसवून मिळावे.

महाराष्ट्र शासनाने 7•5 एच.पी.च्या शेती पंपाचे वीज बिल माफ होणार अशी घोषणा केलेल्या 7•5 एच.पी. शेती पंप धारक ग्राहकांना 10 एच.पी.बिले पाठविलेली आहेत अशा  ग्राहकांनी अनेक दिवस अर्ज केलेला आहे त्या ग्राहकांसाठी कॅम्प लावून त्या अर्जाची  निर्गत लावावी.आजरा तालुक्यामध्ये आपल्या विभागाच्या शेतातून गेलेल्या विद्युत वाहिनी शोर्ट सर्किट होवून झालेल्या जळीतांची अनेक वर्ष नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी.अनेक ग्राहकांनी शेतातील घरांसाठी वीज मागणी अर्ज दिलेले आहेत. त्याच बरोबर गावातील धोका धोकादायक खांब बदलण्याची मागणी केलेले आहे. ती कामे अजूनही सुरु झालेली नाहीत ती तात्काळ चालू करावी. अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.तसेच यावेळी जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, तालुका प्रमुख युवराज पोवार, भुदरगड तालुक्याचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, कॉ. शांताराम पाटील तसेच बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी डॉ. उल्हास त्रिरत्ने यांची भाषणे झाली.
 

*या मोर्चाचे वैशिष्ट म्हणजे यातील महत्वाच्या मागण्या लगेच मान्य करून घेऊन लेखी घेण्यात यश आलेले आहे *यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, दयानंद भोपळे, हरिभाऊ कांबळे (जय शिवराय शेतकरी संघटना )समीरभाई चांद,संजय येसादे विश्वास किल्लेदार, शिवाजी आडाव, हरिश्चंद्र व्हराकटे, सुयश पाटील, महेश पाटील, रवींद्र सावंत,गीता देसाई, दिनेश कांबळे, अमित गुरव,दत्तात्रय पाटील, रोहन गिरी,बिलाल लतीफ,डॉ. रोहन जाधव,अबूहुरेर माणगावकर नदीम तकीलदार, देवदास बोलके यांच्यासह शिवसैनिक व तालुकावासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपपोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या नेतृत्वात अगदी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्था बघडू नये यासाठी उप पोलीस निरीक्षक सरवदे यांनी खास काळजी घेतली होती. त्यानुसार पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.


*आजऱ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे स्मार्ट मीटर सक्ती विरोधात भव्य तिरडी मोर्चा
Total Views: 17