बातम्या

महापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजी

Mayors Janata Darbar rescheduled from August 5 to August 11


By nisha patil - 4/8/2026 8:26:04 PM
Share This News:



महापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजी

कोल्हापूर, दि.४ : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सौ. रूपाराणी निकम या शहरातील नागरिकांच्या महापालिकेतील विविध कामकाजाबाबत येणाऱ्या समस्या व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या ५ तारखेला "जनता दरबार" आयोजित करतात.

            मात्र, ऑगस्ट २०२६ महिन्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापूर शहरातील विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याचा दौरा तसेच शहरातील मतदार पुनर्निरीक्षण व नोंदणीच्या कामाचे नियोजन सुरू असल्यामुळे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी या कामकाजात व्यस्त आहेत.

त्यामुळे ऑगस्ट महिन्यातील दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी होणारा "जनता दरबार" पुढे ढकलण्यात आला असून तो आता दि. ११ ऑगस्ट २०२६, मंगळवार रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी व आपल्या समस्या, तक्रारी व सूचना घेऊन दि.११ ऑगस्ट 2026 रोजी आयोजित "जनता दरबार"मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महापौर सौ. रूपाराणी निकम यांनी केले आहे.


महापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजी
Total Views: 8