बातम्या

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त  विवेकानंद कॉलेज येथे 'अर्थपूर्ण जीवन' कार्यशाळा संपन्न

Meaningful Life workshop held at Vivekananda College


By nisha patil - 11/9/2026 3:09:33 PM
Share This News:



जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त  विवेकानंद कॉलेज येथे 'अर्थपूर्ण जीवन' कार्यशाळा संपन्न
 

कोल्हापूर दि. 11 : येथील विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर मधील 'समुपदेशन कक्षाच्या' वतीने जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त  'अर्थपूर्ण जीवन' कार्यशाळा संपन्न झाली. कॉलेजचे समुपदेशक श्री विनायक यादव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, आत्महत्या ही एक जागतिक समस्या बनली आहे.

यासाठी समाजातील सर्व घटकांना आत्महत्येची लक्षणे ,कारणे ,उपाययोजना, हेल्पलाइन याची शास्त्रोक्त माहिती असणे गरजेचे आहे. जगात दरवर्षी ७० हजार लोक आत्महत्या करतात आणि युद्धामध्ये ८० हजार लोक मृत्यूमुखी पावतात. वरील आकडेवारीतून आपल्याला आत्महत्या या प्रश्नाची गंभीरता जाणवते.
 

जागतिक आरोग्य संघटनेच्या यावर्षीच्या चेंज द नॅरेटिव्ह  थीमला अनुसरून कार्यशाळेत चर्चा ,ऍक्टिव्हिटी, प्रश्न- उत्तरे, अभिप्राय, शंकानिरसन अशाप्रकारे प्रबोधन झाले. कार्यक्रमाची सांगता अभिनव पद्धतीने सर्वांनी समूहगीत गाऊन झाली.
         

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत, आभार व  सूत्रसंचालन एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा. समीक्षा फराकटे, लेफ्टनंट जे.आर. भरमगोंडा,  एन.सी.सी.,एन.एस.एस.  विद्यार्थी ,विद्यार्थिनी, शिक्षक, कर्मचारी वर्ग  यांची उपस्थिती लाभली. अध्यक्षीय मनोगतात डॉ. कविता तिवडे यांनी मानसिक आरोग्य आणि त्यासाठी समुपदेशन याचे महत्त्व विशद केले. या कार्यशाळेसाठी प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे आणि प्रभारी प्राचार्य डॉ.सी.बी. पाटील यांचे प्रोत्साहन  व मार्गदर्शन मिळाले.


जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त  विवेकानंद कॉलेज येथे 'अर्थपूर्ण जीवन' कार्यशाळा संपन्न
Total Views: 11