बातम्या
कै. डॉ. डी. वाय पाटीलसाहेब निधनाबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया.......!
By nisha patil - 4/8/2026 8:36:04 PM
Share This News:
कै. डॉ. डी. वाय पाटीलसाहेब निधनाबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया.......!
गोरगरिबांची मुले डॉक्टर आणि इंजिनियर व्हावीत हे कै. डी वाय. पाटीलसाहेब यांचे स्वप्न.....!
कोल्हापूरचे सुपुत्र, माजी राज्यपाल, शिक्षणमहर्षी श्री. डी. वाय. पाटीलसाहेब यांच्या निधनामुळे अतिव दुःख झाले. त्यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. विशेषतः तत्कालीन मुख्यमंत्री कै. श्री. वसंतदादा पाटील यांनी व्यवसायिक शिक्षणाबद्दल धोरण आखल्यानंतर महाराष्ट्रामध्ये यासाठी फार मोठा पुढाकार कै. श्री. डी. वाय. पाटीलसाहेबांनी घेतला.
गरीब समाजातील मुले डॉक्टर आणि इंजिनिअर व्हावीत, हे स्वप्न त्यांनी पूर्ण करून दाखवले. राज्यपाल म्हणून त्रिपुरा, बिहार या दोन राज्यांमध्ये त्यांनी काम केले. ते अतिशय धाडसी व जिद्दी स्वभावाचे होते. एखादी गोष्ट मनावर घेतली की जिद्दीने पूर्ण करणारे असे कै. श्री. डी. वाय. पाटीलसाहेब यांचे व्यक्तिमत्त्व होते. अशा एका थोर नेत्याला आणि समाजसेवकाला आपण मुकलेलो आहोत.
कै. डॉ. डी. वाय पाटीलसाहेब निधनाबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया.......!
|