बातम्या
*आगामी गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने तहसील कार्यालयात बैठक संपन्न
By nisha patil - 2/9/2026 11:20:37 PM
Share This News:
*आगामी गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने तहसील कार्यालयात बैठक संपन्न
आजरा(हसन तकीलदार)*:-आगामी गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने आज दिनांक 02/09/2026 रोजी 11.00 वा ते 12.30 वा वेळेत आजरा पोलीस ठाणे हद्दीतील 116 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष,पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य, लोकप्रतिनिधी, पोलीस पाटील, साऊंड सिस्टिम चालक-मालक, पोलीस मित्र यांची प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय आजरा येथे बैठक घेऊन योग्य सूचना देण्यात आल्या.
या बैठकीमध्ये मध्ये प्रामुख्याने एक गाव एक गणपती बाबत गावातील सर्वं मंडळानी विचार करावा.सर्वांनी डॉल्बी मुक्त गणपती उत्सव साजरा करावा.सर्व मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. पारंपारिक वाद्याचा वापर करावा.गणेश मूर्ती लहान व आकर्षक व पर्यावरण पूरक शाडूच्या मातीची असावी.मूर्ती प्रतिष्ठापना ठिकाणी रोज दिवसा व रात्री 24 तास किमान 2 स्वयंसेवक हजर ठेवावे.सोशल मीडियावर कोणतेही आक्षेपार्ह, धार्मिक तेढ निर्माण करणारे किंवा सामाजिक सलोखा बिघडवणारे पोस्ट प्रसारित करू नये, अशी पोस्ट आल्यास तात्काळ डिलिट करून त्याबाबत पोलिसांना अवगत करावे.मिरवणूक वेळेत काढून वेळेत समाप्त करावी.
गावातील धार्मिक स्थळ येथून मिरवणुक नेताना कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी. मिरवणूक मागे पुढे घेण्याच्या कारणावरून वाद विवाद करू नये.अमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे इसमांचे बाबत माहिती मिळालेस तात्काळ पोलीस प्रशासनाच्या पर्सनल नंबर वर संपर्क साधावा. जी मंडळे ध्वनी प्रदूषण करतील त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी समज देण्यात आली. जी मंडळे महाप्रसाद आयोजन करणार आहेत त्यांनी अन्न व प्रशासन विभाग यांचेकडून तपासणी करून घ्यावी. मिरवणुकीत वापरण्यात येणारे ट्रॅक्टर,वाहने यांची सुस्थितीत आहे अगर तसे याची तपासणी करून घ्यावी. सर्व मंडळानी सामाजिक व विधायक उपक्रम राबवावेत तसेच वरिष्ठ कार्यालय कडून प्राप्त सर्व सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी आजरा तहसीलदार समीर माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे,गटविकास अधिकारी सुभाष सावंत, मुख्याधिकारी सूरज सुर्वे, महावितरण अधिकारी अतुल पाटील, मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील , शांतता कमिटी सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य, पोलीस मित्र, साऊंड सिस्टिम चालक-मालक आदिजण बहुसंख्येने उपस्थित होते.
*आगामी गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने तहसील कार्यालयात बैठक संपन्न
|