बातम्या
*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या तर्फे आजरा नगरपंचायतीला निवेदन
By nisha patil - 7/23/2026 3:25:38 PM
Share This News:
*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या तर्फे आजरा नगरपंचायतीला निवेदन
*गतिरोधक बसवा व अपघाताला निमंत्रण देणारी पार्किंग बंद करा
*आजरा(हसन तकीलदार):-विठ्ठल मंदिर (परुळेकर )ते आय. सी. आय. सी. बँक पर्यंतच्या नवीन झालेल्या रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची व चार चाकी वाहने पार्किंग बंद करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहर अध्यक्ष समीरभाई चांद यांनी मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, विठ्ठल मंदिर ते आय. सी. आय. सी. बँक येथील काँक्रिटचा नवीन रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावरून वाहने सुसाट जात आहेत. त्यामुळे या मार्गावर असलेल्या स्वामी विवेकानंद, उर्दू आणि कन्या विद्या मंदिर या प्राथमिक शाळांचे जवळजवळ 600 विद्यार्थी याठिकाणी शाळेला ये जा करीत असतात. त्याच प्रमाणे या शाळांजवळ चार चाकी पार्किंग केल्यामुळे शाळेच्या गेट मधून अचानक विद्यार्थी बाहेर पडल्यास वाहन चालकास दिसत नाही. अचानक वाहनासमोर आल्यामुळे अपघात होऊन जीवत हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्यावरील पार्किंग बंद करावी व गतिरोधक बसवण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनावर समीरभाई चांद, महमदरसूल लाडजी, अझरुद्दीन खेडेकर, सफवान काकतिकर, बाशीत भडगावकर, सलीम वाडीकर, अमजद चांद, आक्रम लाडजी, वाहिद फकीर, रफिक मुराद, समीर लाडजी आदींच्या सह्या आहेत.
*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या तर्फे आजरा नगरपंचायतीला निवेदन
|