बातम्या
सवत कडा पर्यटनस्थळाबाबत प्रशासनाला निवेदन!
By nisha patil - 10/8/2026 3:12:54 PM
Share This News:
सवत कडा पर्यटनस्थळाबाबत प्रशासनाला निवेदन!
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील सवत कडा येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत मयत युसूफ मेहबूब शेख यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळावरील सुरक्षा व्यवस्था, प्रवेश शुल्क, महसूल, रस्ता, वृक्षतोड आणि पर्यटन विकासकामांबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
या सर्व प्रश्नांची कागदोपत्री व पारदर्शक उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत, या मागणीसाठी आज संबंधित प्रशासनाकडे ई-मेलद्वारे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले आहे.
या निवेदनाद्वारे प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे की—
🔹 सवत कडा येथे आकारण्यात येणाऱ्या प्रवेश शुल्काचा संपूर्ण हिशेब जाहीर करावा.
🔹 जमा झालेल्या महसुलापैकी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किती निधी खर्च झाला, याची माहिती द्यावी.
🔹 पर्यटनस्थळी सुरक्षा व्यवस्था, प्रथमोपचार व आपत्कालीन बचाव यंत्रणा सक्षम करावी.
🔹 रस्ता व इतर विकासकामांच्या सर्व प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी तपासाव्यात.
🔹 वनजमिनीच्या वापराबाबत आवश्यक परवानग्या घेतल्या होत्या का, याची चौकशी करावी.
🔹 वृक्षतोड झाली असल्यास तिच्या परवानग्या, पंचनामा व अधिकृत नोंदी तपासाव्यात.
🔹 पर्यटन व्यवस्थापनाची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे, हे स्पष्ट करावे.
🔹 मयत युसूफ मेहबूब शेख यांच्या मृत्यूची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी.
🔹 भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी तातडीने ठोस सुरक्षा उपाययोजना कराव्यात.
आमचा पर्यटन विकासाला विरोध नाही.
पर्यटन वाढले पाहिजे.
रोजगार निर्माण झाला पाहिजे.
स्थानिकांचा विकास झाला पाहिजे.
पण—
पर्यटन विकास कायद्याच्या चौकटीत आणि जनतेच्या सुरक्षिततेची हमी देऊनच झाला पाहिजे!
नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत.
महसुलाचा हिशेब जनतेला मिळालाच पाहिजे.
आणि जनतेच्या जीवाची किंमत कोणत्याही विकासापेक्षा मोठी आहे.
मयत युसूफ मेहबूब शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
डॉ. युवराज रामचंद्र येडूरे
अध्यक्ष — महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन
नेते — महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कोल्हापूर
सवत कडा पर्यटनस्थळाबाबत प्रशासनाला निवेदन!
|