बातम्या

प्राचार्य डॉ. पी. आर. शेवाळे : व्यक्ती व विचार यावर शहाजी महाविद्यालयात स्मृती व्याख्यान संपन्न 

Memorial lecture on The Person and His Thoughts


By nisha patil - 3/9/2026 5:07:05 PM
Share This News:



प्राचार्य डॉ. पी. आर. शेवाळे : व्यक्ती व विचार यावर शहाजी महाविद्यालयात स्मृती व्याख्यान संपन्न 

कोल्हापूर : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील  माजी इंग्रजी विभाग प्रमुख व डी.डी.शिंदे सरकार कॉलेजचे प्राचार्य स्वर्गीय डॉ.पी आर शेवाळे : व्यक्ती व विचार या विषयावर श्री शहाज छत्रपती महाविद्यालयात स्मृती व्याख्यान संपन्न झाले.महाविद्यालयातील माजी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.यु बी मुजुमदार व प्रा.यु एस अपराध यांनी डॉ.शेवाळे यांच्या स्मृतींना व  कार्याला उजाळा दिला .
 

 महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या व्याख्यान कार्यक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. डॉ. मुजुमदार यांनी प्रा. शेवाळे सरांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक कार्याचा व महाविद्यालयात त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला .प्रा. यु एस अपराध म्हणाले, प्राचार्य शेवाळे शांत संयमी व सर्वांना प्रेरणादायी असे व्यक्तिमत्व होते. त्यांनी आमच्यासारखे विद्यार्थी उभे केले आणि माणसं घडवली. शहाजी महाविद्यालयाच्या विकासामध्ये त्यांचे मौलिक योगदान आहे.  प्राचार्य शेवाळे यांच्या पत्नी श्रीमती शेवाळे मॅडम यांनी आपण शेवाळे सरांच्या मुळे चांगले शिक्षण घेऊन नोकरी करू शकलो असे सांगितले .
 
प्राध्यापक प्रबोधिनी व इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम संपन्न झाला. स्वागत व प्रास्ताविक डॉ.डी.पी.गावडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. स्नेहल भोसले यांनी केले. आभार इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. एन एस जाधव यांनी मानले. यावेळी शेवाळे सर यांचे कुटुंबीय,  डॉ. आर डी मांडणीकर  डॉ.के एम देसाई, प्रबंधक रवींद्र भोसले,सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.


प्राचार्य डॉ. पी. आर. शेवाळे : व्यक्ती व विचार यावर शहाजी महाविद्यालयात स्मृती व्याख्यान संपन्न 
Total Views: 50