बातम्या

शहाजी महाविद्यालयात बहुभाषिक स्वरचित कवितांचे कवी संमेलन संपन्न

Multilingual self composed poetry


By nisha patil - 12/8/2026 3:26:59 PM
Share This News:



शहाजी महाविद्यालयात बहुभाषिक स्वरचित कवितांचे कवी संमेलन संपन्न

कोल्हापूर : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात आईक्यूएसी, भाषा विभाग व शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने बहुभाषिक स्वरचित कवितांचे कवी संमेलन संपन्न झाले. महाविद्यालयातील अनेक नवकवी, कवित्री, विद्यार्थी व प्राध्यापक यांनी या कवी संमेलनात उत्स्फूर्तपणे भाग घेऊन विविध विषयांवरील कविता सादर केल्या.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. 
   

भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम संपन्न झाला. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. 
   

प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी त्यांच्या किनारा या कवितासंग्रहातील बाबासाहेब ही कविता सादर करून उत्कट भावभावनांचा सुंदर अविष्कार म्हणजे कविता आहे असे सांगितले. डॉ. रचना माने  प्रा. पि.के.पाटील  प्रा. मनोज कांबळे  सृष्टी कोडक, समीक्षा चव्हाण, समृद्धी गुरव  प्रांजल कळके, अलिषा समुद्रे, प्रभाराणी राणे, सायली पाटील, वैष्णवी सुतार, आदित्य निगडे, प्राची मिठारे , सानिया भोकरे मोमीन , प्राची फडतरे, सायली कुंभार यांनी आपल्या स्वरचित कविता सादर करून व श्रोत्यांची वाहवा मिळवली. 
   

स्वागत, प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील यांनी केले. डॉ.डी.के.वळवी यांनी काव्य संमेलनाचा हेतू विशद केला. सूत्रसंचालन डॉ. दया पाटील यांनी केले.  डॉ. प्राजक्ता रेणुसे यांनी आभार मानले. 
डॉ. आर. डी. मांडणीकर डॉ.के.एम.देसाई डॉ. ए. बी. बलुगडे,डॉ.एन.एस.जाधव, डॉ. डी. एल. काशीद- पाटील, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी ,विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्वरचित केलेल्या कवितांचे यावेळी भिंती पत्रकाद्वारे प्रदर्शन करण्यात आले.


शहाजी महाविद्यालयात बहुभाषिक स्वरचित कवितांचे कवी संमेलन संपन्न
Total Views: 7