बातम्या

गोखले कॉलेज ते मंगेशकर नगरपर्यंत महापालिकेचा बुलडोझर; अतिक्रमणांवर धडक कारवाई!

Municipal Corporations bulldozer from Gokhale College


By nisha patil - 11/9/2026 3:23:29 PM
Share This News:



गोखले कॉलेज ते मंगेशकर नगरपर्यंत महापालिकेचा बुलडोझर; अतिक्रमणांवर धडक कारवाई!

 

शहरातील रस्त्यांवर अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर महापालिकेने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. गोखले कॉलेज ते मंगेशकर नगर परिसरातील मुख्य रस्त्यांवर महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक दोन आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईवेळी महापौर रुपाराणी निकम यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणी केली.

महापालिकेच्या पथकाने कारवाई करताना ३ लोखंडी स्ट्रक्चर, २ हातगाड्या, लोखंडी कपाट, स्टॅंड बोर्ड, लोखंडी पाईप बोर्ड, ८ पत्रा पेट्या आणि २ पत्रे, तसेच इतर अनधिकृत साहित्य जप्त केलं. कारवाई सुरू होताच काही हातगाडीधारक आणि विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांनी स्वतःहून साहित्य हटवलं. मात्र, वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण न हटवणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात आली.

विशेष म्हणजे, जप्त करण्यात आलेलं साहित्य संबंधित व्यावसायिकांना परत न देता कायमस्वरूपी जप्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमणांविरोधात यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचं महापालिकेने स्पष्ट केलं आहे.


गोखले कॉलेज ते मंगेशकर नगरपर्यंत महापालिकेचा बुलडोझर; अतिक्रमणांवर धडक कारवाई!
Total Views: 22