बातम्या
महापालिकेची अचानक तपासणी; २० स्वच्छता कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई!
By nisha patil - 11/9/2026 3:25:16 PM
Share This News:
महापालिकेची अचानक तपासणी; २० स्वच्छता कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई!
कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चारमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांची अचानक तपासणी करण्यात आली आणि तब्बल २० कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ताराबाई पार्क येथील सासने मैदानावर उपायुक्त परितोष कंकाळ यांनी अचानक स्वच्छता कर्मचाऱ्यांची ओळख परेड घेतली. यावेळी सतत गैरहजर राहणे, कामात दिरंगाई करणे, गणवेश न घालणे, डमी कर्मचारी लावणे आणि वरिष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे, असे प्रकार समोर आले.
गणवेश न परिधान केलेल्या ११ कर्मचाऱ्यांसह ओळख परेडसाठी विनापरवाना गैरहजर राहिलेल्या ७ कर्मचाऱ्यांवर प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड करण्यात आला. तर अन्य दोन कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ही दंडाची रक्कम वेतनातून वसूल करण्याचे आदेश उपायुक्त कंकाळ यांनी दिले. यावेळी प्रभागातील कचरा संकलन, घंटागाड्यांचे वेळापत्रक, धुर व औषध फवारणी तसेच स्वच्छतागृहांच्या दैनंदिन साफसफाईबाबतही कर्मचाऱ्यांना कडक सूचना देण्यात आल्या.
महापालिकेची अचानक तपासणी; २० स्वच्छता कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई!
|