बातम्या

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा 'जनसेवा सप्ताह' उत्साहात

NCP Student Congress


By nisha patil - 7/28/2026 3:11:02 PM
Share This News:



स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा 'जनसेवा सप्ताह' उत्साहात

कागल प्रतिनिधी अजित बोडके स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कागल तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेला 'जनसेवा सप्ताह' सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला.

या सप्ताहात समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. स्व. गणपतराव गाताडे बौद्धिक अक्षमता विद्यालयातील विद्यार्थ्यांना वारकरी पोशाख, केक व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच विद्या मंदिर, बामणी येथे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

विद्या मंदिर, गोरंबे येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जीवनकार्यावर आधारित निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पौष्टिक आहारही देण्यात आला. तसेच कागल ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वाघजाई डोंगर परिसरात वृक्षारोपण व वृक्ष संगोपनाचा उपक्रम देखील राबविण्यात आला.

यावेळी कागल तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तेजस चौगुले, उपाध्यक्ष गौरव बोभाटे, शर्विल सामंत, चिरायू संकपाळ, धीरज पाटील, संकेत चितारी, रोहित पाटील, सुमित पाटील आणि विनायक घाटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा 'जनसेवा सप्ताह' उत्साहात
Total Views: 12