बातम्या
विद्यार्थ्यांच्यावर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन तर्फे बंदची हाक*
By nisha patil - 7/22/2026 7:07:50 PM
Share This News:
**विद्यार्थ्यांच्यावर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन तर्फे बंदची हाक*
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी 23 जुलै ला केली महाराष्ट्र बंदची घोषणा*
*आजरा(हसन तकीलदार)*:-20 जुलै रोजी दिल्लीत शांततेने आंदोलन करणाऱ्या निःशस्त्र विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या आणि लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी तसेच त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ व पोलिसांच्या या दडपशाहीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने 23 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे.
त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्र बंदच्या आदेशानुसार आजरा बंद ठेवण्यासाठी वंचित बहुजन पार्टी आजराच्या वतीने आजरा व्यापारी असोसिएशनला याबद्दल सहकार्य करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर सर्व समविचारी संघटना, विद्यार्थी आणि सर्व स्तरातील नागरिकांनी एकत्र येऊन 23 जुलैच्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्याची विनंती करण्यात आली आहे.
याबाबतचे पत्र आजरा तहसीलदार, आजरा पोलीस ठाणे तसेच आजरा व्यापारी असोसिएशनला देण्यात आले आहे. निवेदनावर संतोष मासोळे (तालुकाध्यक्ष), दत्तात्रय कांबळे (जिल्हा उपाध्यक्ष), कॉ. काशिनाथ मोरे, सुप्रिया डेळेकर, शोभा कांबळे आदींच्या सह्या आहेत.
विद्यार्थ्यांच्यावर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन तर्फे बंदची हाक*
|