बातम्या

आजऱ्यात नरवीर शिवा काशीद पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न**

Narvir shiva kashid


By nisha patil - 7/13/2026 12:22:24 PM
Share This News:



**आजऱ्यात नरवीर शिवा काशीद पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न**

**आजरा(हसन तकीलदार)*-:स्वराज्यरक्षक नरवीर शिवा काशीद यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजरा येथील शिवतीर्थावर अभिवादन आणि पुण्यतिथी कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नरवीर शिवा काशीद यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.या कार्यक्रमाला आजऱ्याचे नगराध्यक्ष अशोक अण्णा चराटी आणि सरपंच परिषद, मुंबई जिल्हाअध्यक्ष इंजि. जी. एम. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यासोबतच मराठा महासंघ आजरा तालुका अध्यक्ष मारुती मोरे, संभाजी इंजल, तातू्अण्णा बटकडली यांचेबरोबरच नाभिक समाज संघटना आजरा तालुका यांचीही उपस्थिती लाभली.नाभिक समाज संघटनेची समाजाचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी नाभिक समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष आकाश शिंदे, उपाध्यक्ष गौतम भोसले,निलेश साळोखे, सचिव प्रकाश यादव, सल्लागार समिती प्रमुख कृष्णा यादव, संजय पाचवडेकर यांच्यासह सर्व संचालक मंडळ आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नरवीर शिवा काशीद यांच्या स्वराज्य उभारणीतील अतुलनीय त्यागाचे व शौर्याचे स्मरण केले व त्यांना अभिवादन केले.


आजऱ्यात नरवीर शिवा काशीद पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न**
Total Views: 311