बातम्या
प्रकृतीच्या कारणांसह निवडणूक प्रक्रियेवरील अविश्वासाचा उल्लेख; बीएलओ सहाय्यकपदातून मुक्ततेची अंगणवाडी सेविकेची मागणी
By nisha patil - 7/14/2026 6:30:38 PM
Share This News:
प्रकृतीच्या कारणांसह निवडणूक प्रक्रियेवरील अविश्वासाचा उल्लेख; बीएलओ सहाय्यकपदातून मुक्ततेची अंगणवाडी सेविकेची मागणी
कोल्हापूर : अंगणवाडी सेविका डॉ. दीपा गिरीश देशपांडे यांनी २७६ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे मतदान नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारे यांच्याकडे निवेदन सादर करून बीएलओ सहाय्यक म्हणून नेमण्यात आलेल्या निवडणूक कामातून मुक्त करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात त्यांनी मासिक पाळीदरम्यान होणारा अतिरक्तस्राव, अशक्तपणा व सुरू असलेल्या औषधोपचारांमुळे अंगणवाडीच्या नियमित कामासोबत अतिरिक्त निवडणूक काम करणे शक्य नसल्याचे नमूद केले आहे. तसेच, निवडणूक प्रक्रियेबाबत स्वतःचा अविश्वास असल्याने हे काम करण्याची मानसिक तयारी नसल्याचाही उल्लेख केला आहे.
प्रशासनाने त्यांच्या प्रकृतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून निवडणुकीशी संबंधित कोणत्याही कामासाठी सक्ती करू नये आणि बीएलओ सहाय्यकपदावरील त्यांची नियुक्ती तातडीने रद्द करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रती बालविकास अधिकारी निवेदिता महाडिक तसेच मुख्य सेविका बोधिकर यांनाही देण्यात आल्या आहेत.
टीप : निवेदनात नमूद करण्यात आलेले निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील आरोप व दावे हे संबंधित अर्जदाराचे वैयक्तिक म्हणणे असून, त्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
प्रकृतीच्या कारणांसह निवडणूक प्रक्रियेवरील अविश्वासाचा उल्लेख; बीएलओ सहाय्यकपदातून मुक्ततेची अंगणवाडी सेविकेची मागणी
|