बातम्या

निपाणी तालुका शिक्षक संघटनेच्या वतीने सात शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार

Nippani


By nisha patil - 6/9/2026 3:11:38 PM
Share This News:



**निपाणी तालुका शिक्षक संघटनेच्या वतीने सात शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार*

शिक्षक दिनाचे औचित्य साधत संपन्न झाला पुरस्कार वितरण सोहळा*

*आजरा(हसन तकीलदार)*:-निपाणी तालुका शिक्षक संघटनेच्यावतीने ७ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानुसार पुरस्काराचे वितरण शनिवार दि.५ रोजी निपाणी येथे झालेल्या जिल्हा व तालुकास्तरीय शिक्षकदिन कार्यक्रमात झाले.शारीरिक शिक्षण विभागातील अकोळ येथील कन्नड शाळेचे शिक्षक लकाप्पा रबकवी तर मुख्याध्यापक गटातून बुदलमुख पांगिरे,

प्राथमिक शाळेचे शिक्षक कमलाकर राबते, जत्राट कन्नड शाळेचे शौकत अल्ली अत्तार, माणकापूर येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक अण्णासो खोत तर उर्दू विभागातील कारदगा येथील उर्दू शाळेच्या शिक्षिक सालेहा मकानदार(तकीलदार ),उत्कृष्ट स्काऊट शिक्षक म्हणून बेनाडी येथील कन्नड शाळेचे शिक्षक राजू कोकणे तर उत्कृष्ट गाईड म्हणून केबीएस शाळा. नं. ३ च्या शिक्षिका रोहिणी शिराळकर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    आत्तापर्यंत शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन तालुका संघटनेने विविध निकषाच्या आधारे शिक्षकांना आदर्श पुरस्कार जाहीर केले होते. आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त सालेहा मकानदार (तकीलदार)या आमच्या चॅनेलचे आजरा प्रतिनिधी हसन तकीलदार यांच्या स्नुषा आहेत.


निपाणी तालुका शिक्षक संघटनेच्या वतीने सात शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार
Total Views: 557