बातम्या

कोल्हापूर शिवसेनेच्या वतीने सोनम वांगचुक यांच्या उपोषण - लढ्याला पाठिंबा देत सरकारच्या दडपशाही - हुकूमशाही विरोधात जोरदार घोषणाबाजी...

On behalf of the Kolhapur Shiv Sena


By nisha patil - 7/20/2026 11:39:55 AM
Share This News:



कोल्हापूर शिवसेनेच्या वतीने सोनम वांगचुक यांच्या उपोषण - लढ्याला पाठिंबा देत सरकारच्या दडपशाही - हुकूमशाही विरोधात जोरदार घोषणाबाजी...

 कोल्हापूर - ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ,संशोधक सोनम वांगचुक, हे देशभरातील चाललेल्या अनेक सरकारच्या मनमानी कारभाराबद्दल गेले 21 दिवस उपोषणाला बसले होते, त्यामधील प्रमुख मागणी देशभरातील सातत्याने होणाऱ्या पेपर लीकमुळे (फु्टीमुळे )विद्यार्थ्यांचे करियर बरबाद होत चालल्याने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही होती..
 

पण हजारो - लाखो विद्यार्थ्यांसाठी संविधानिक लढणाऱ्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला काल या सरकारने हुकूमशाही पद्धतीने मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, त्यांना शिवीगाळ केली,याचा निषेध म्हणून आज कोल्हापूर शिवसेनेच्या वतीने सोनंम वांगचुक यांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी करून केंद्र सरकारच्या विरोधात तसेच केंद्रीय गृह खात्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी व निषेध नोंदवून सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या, तसेच या आंदोलनात संविधान बचाव चा संदेश देत,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती केलेला एक युवक हातात संविधान घेऊन,संविधान बचाव चा उपदेश देणारा प्रसंग दाखवला गेला..
 

या आंदोलनात सोनम वांगचूक यांच्या सरकार विरोधी या लढ्याला एकमताने पूर्ण पाठिंबा जाहिर केला...
यावेळी उपस्थित शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख विराज पाटिल, नियोजक शिवसेना शहर प्रमुख मंजित माने, महिला जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुंरे, उपजिल्हा प्रमुख अवधूत साळोखे, स्मिता सावंत,राहूल माळी, दीपक गौड, विकी मोहिते, दिनेश साळोखे, विनोद खोत,केदार वाघापूरकर, शौनक भिडे, चैतन्य देशपांडे, शुभम पाटील, कनिष्क शिंदे, अक्षय घाटगे,आदित्य हुलजी,राज झांबरे,शुभांगी साळोखे, रणजित आयरेकर, दीपाली शिंदे, आणि ठोंबरे,सुप्रिया पाटील, रुपेश रोडे, दिलीप देसाई, सदाशिव पवार, सानिका दामूगडे, ममता पाखरे, पूर्वा जाधव, 
सॅम गायकवाड,तृप्ती विभुते, सिद्धी दामूगडे, भरत आमटे,ऋषी जोशी,सरदार टिप्पे, आदित्य दिसलें, यशराज ताकटे, रोहित हांडे,प्रथमेश देशिंगे,


कोल्हापूर शिवसेनेच्या वतीने सोनम वांगचुक यांच्या उपोषण - लढ्याला पाठिंबा देत सरकारच्या दडपशाही - हुकूमशाही विरोधात जोरदार घोषणाबाजी...
Total Views: 15