बातम्या

वडिलांच्या पश्च्यात २८ वर्षानंतर अनुकंपा तत्वावर मुलाला वन विभागामध्ये नोकरीत घेण्याचे मा. उच्च न्यायालय मुंबई सर्किट बेंच कोल्हापूर यांचे आदेश.

Order by the Honble High Court of Bombay


By nisha patil - 8/13/2026 2:38:48 PM
Share This News:



वडिलांच्या पश्च्यात २८ वर्षानंतर अनुकंपा तत्वावर मुलाला वन विभागामध्ये नोकरीत घेण्याचे मा. उच्च न्यायालय मुंबई सर्किट बेंच कोल्हापूर यांचे आदेश.

कै. बबन कट्टी हे सन १९८४ पासून वन विभाग सांगली येथे ड्राईव्हर म्हणून नोकरीस होते, ते दि.२९/१२/१९९८ रोजी नोकरीवर असताना, अपघात होवून मयत झाले. कै. बबन कट्टी यांचे पश्च्यात त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणेकरिता, त्यांची पत्नी श्रीमती. संगीता बबन क‌ट्टी यांनी, वन विभाग सांगली यांचेकडे दि.०९/०३/१९९९ रोजी अर्ज दिला होता. त्यावेळी श्रीमती. संगीता कट्टी यांचे वय ३१ वर्ष होते, त्यांचा मुलगा निलेश कट्टी हा अज्ञान ५ वर्षाचा होता. श्रीमती. संगीता कट्टी यांच्या अर्जान्वये जवळ-जवळ १० वर्ष त्यांना अनुकंपा तत्वावर नोकरीमध्ये वन विभागामध्ये सामावून घेतले नाही. त्यांचे नाव अनुकंपा तत्वाच्या प्रत्यक्ष यादीमध्ये होते.

दि. ११/११/२००८ रोजी वन विभाग सांगली यांनी श्रीमती. संगीता कट्टी यांना त्यांचे वय वर्ष ४० पूर्ण झाले असल्याने, त्यांचे नाव अनुकंपा तत्वाच्या प्रत्यक्ष यादीमधून कमी केल्याचे कळविले. तदनंतर, सन २०११ मध्ये श्रीमती. संगीता कट्टी यांचा मुलगा निलेश कट्टी सज्ञान झाल्यानंतर, त्यांने दि.२५/०४/२०११ रोजी वन विभाग सांगली यांचेकडे त्यांना, त्यांच्या वडिलांच्या जागी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणेकरिता अर्ज केला.

श्री. निलेश कट्टी यांचा अर्ज वन विभाग सांगली यांच्याकडे जवळ-जवळ ११ वर्ष कार्यवाहीसाठी प्रलंबित होता. तदनंतर, अचानक दि. १६/०६/२०२५ रोजी श्री. निलेश कट्टी यांना, मुख्य वन संरक्षण (प्रादेशिक कोल्हापूर) यांचे कडून शासन निर्णय सन २००५ व सन २०१० नुसार प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांचे वय वर्ष ४० पूर्ण झाल्यानंतर, प्रतीक्षा यादी मधील बानंतर नवीन उमेदवारांचे नाव समाविष्ट करता येत नाही, असे कळवून, यांचा आईच्या ऐवजी त्यांचे नाव अनुकंपा तत्वाच्या प्रत्यक्ष यादीमध्ये काली काढला.

तदनंतर दि. १७/०७/२०२५ रोजी शासन निर्णय लागू झाला, सदर शासन निर्णया नुसार प्रत्यक्ष यादीमधील नाव बदलण्याची तरतूद करण्यात आली, त्यावरून श्री. निलेश कट्टी यांनी वन विभाग सांगली यांच्याकडे दि.०८/१०/२०२५ रोजी अर्ज देवून, पुन्हा विनंती केली, परंतु वन विभाग सांगली कडून कोणतीही कार्यवाही झाली नाही.

त्यावर नाराज होवून वन विभाग सांगली यांच्या अन्यायकारी गैरकृत्याबाबत मा.उच्च्‍ न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूर यांचे न्यायालय मध्ये रिट पिटीशन नं. १२६८८/२०२५  अॅड. हितेश जी. राणिंगा  व अॅड. सरिता एन. घोरपडे यांच्या व्दारे दाखल केले. सदर रिट निलेश कट्टी यांच्या मार्फत अॅड. हितेश जी. राणिंगा व अॅड. सरिता एन. घोरपडे यांनी केलेला  युक्तीवाद ग्राह्य धरून, मा.उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूर यांनी दि.10.8.2026 रोजी वन विभाग सांगली यांना आदेश देवून, श्री. निलेश कट्टी यांना त्यांचे वडील कै.बबन कट्टी यांच्या जागी अनुकंपा तत्वावर मा. उच्च न्यायालय मुंबई नागपूर बेंच –

मधील फुल बेंचच्या कल्पना तारम विरुद्ध महाराष्ट्र सरकार या निकालाचा दाखला देत नोकरीवर घेण्याचे आदेश दिले आहेत. श्री. निलेश कट्टी यांचे वतीने अॅड. हितेश जी. राणिंगा  व ॲङ सरिता एन. घोरपडे यांनी काम पाहिले.


वडिलांच्या पश्च्यात २८ वर्षानंतर अनुकंपा तत्वावर मुलाला वन विभागामध्ये नोकरीत घेण्याचे मा. उच्च न्यायालय मुंबई सर्किट बेंच कोल्हापूर यांचे आदेश.
Total Views: 20