बातम्या
*ज्याचा विचारसुद्धा करु शकत नाही ते आमचे कार्यकर्ते करून दाखवतात-डॉ. उल्हास त्रिरत्ने
By nisha patil - 7/20/2026 11:42:15 AM
Share This News:
*ज्याचा विचारसुद्धा करु शकत नाही ते आमचे कार्यकर्ते करून दाखवतात-डॉ. उल्हास त्रिरत्ने
*आजरा(हसन तकीलदार)-:संविधानिक पद्धतीने लढा देऊन त्याचा पाठपुरावा करून यश मिळवण्याची हातोटी बहुजन मुक्ती पार्टीमध्ये आहे. कोणताही प्रश्न एकदा हाती घेतला की टप्प्या टप्प्याने आंदोलने करून त्यात यश मिळवण्याची क्षमता बहुजन मुक्ती पार्टीमध्ये आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम ही पार्टी करते. निःस्वार्थपणे काम करण्याची त्यांची हातोटी आहे. स्मार्टमीटर विरोधात त्यांनी आता लढा सुरु केला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने स्मार्ट मीटरला जुने डिजिटल मीटर बसवून स्मार्ट मीटरची विश्वासार्हता तपासण्याची मागणी त्यांनी केली आहे.
स्मार्ट मीटरमुळे दुपटीने तीपटीने वीज बिले येत आहेत. वाढत्या वीजबिलामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. महावितरणचे अधिकारी स्मार्ट मीटर योग्य व अचूक असल्याचे सांगत स्मार्ट मीटरचे फायदे जरी सांगत असले तरी स्मार्ट मीटर सर्वसामान्य जनतेला भुर्दंड आहे. वायरिंग किंवा अर्थिंगमध्ये जरी दोष असला तरी या स्मार्टमीटरमध्ये वीज न वापरताही त्याची मोजणी होते. त्यामुळे वीजबिल जादा येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. एकंदरीत हे मीटर सर्वसामान्य जनतेची लुटच करीत आहे. यासाठी बहुजन मुक्ती पार्टीने या स्मार्ट मीटरला जुने डिजिटल समांतर मीटर बसवून स्मार्ट मिटरची अचूकता तपासून निर्दोषता सिद्ध करावी अशी मागणी केली आहे.
यावेळी बोलताना डॉ. उल्हास त्रिरत्ने म्हणाले की, याच आधारे बामसेफ, राष्ट्रीय किसान मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते अमित तरवाळ रा. चंदगड यांनी महावीतरणला त्यांच्या घरातील जुने मीटर काढू दिले नाही व महावीतरणच्या लोकांना जुने मीटर आणि स्मार्ट मीटर एकत्र जोडायला भाग पाडले. जितके रिडींग जुन्या मिटरमध्ये येईल तितकेच मिटर रिडींग स्मार्ट मिटरमध्ये आले पाहिजे जर स्मार्ट मिटर जास्त रिडींग दाखवत असेल तर याचा अर्थ स्मार्ट मिटरमध्ये निश्चितच गडबड घोटाळा आहे. आमच्या पार्टीचे विद्रोही कार्यकर्ते अमित तरवाळ यांच्या कार्याला खरोखरच सलाम आहे. इतर लोक जे करण्याचा विचारसुद्धा करु शकत नाहीत तेथे अन्यायाचा प्रतिकार केवळ आणि केवळ आमचे कार्यकर्ते करु शकतात. व्यवस्था परिवर्तन फक्त महापुरुषांच्या विचारधारेवर चालणारे विद्रोही लोकच करु शकतात असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉ. सुदाम हरेर, अमित सुळेकर, राहुल मोरे, शरद पाटील, संजय कांबळे, गौतम मोरे, अमित तरवाळ आदिजण उपस्थित होते.
*ज्याचा विचारसुद्धा करु शकत नाही ते आमचे कार्यकर्ते करून दाखवतात-डॉ. उल्हास त्रिरत्ने
|