बातम्या
विवेकानंद कॉलेज मध्ये ‘नकाशा वाचन’ मार्गदर्शन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
By nisha patil - 8/29/2026 1:41:52 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेज मध्ये ‘नकाशा वाचन’ मार्गदर्शन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर दि.29 : विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथील ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन NCC विभागाच्या वतीने नकाशा वाचन (Map Reading) विषयावर दोन दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी कॅडेट्सना मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनासह NCC प्रशिक्षणामध्ये नकाशा वाचनाचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. स्वतः NCC ‘C’ Certificate धारक असल्याने त्यांनी आपल्या अनुभवांच्या आधारे कॅडेट्सना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक JCO मिलिंद देसाई यांनी नकाशा वाचनाचे सविस्तर व प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले. NCC ‘B’ व ‘C’ Certificate परीक्षेतील Map Reading चे महत्त्व व त्याचे Weightage याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नकाशाचे प्रकार, नकाशातील चिन्हे, दिशा ओळखण्याच्या पद्धती, नकाशाची हाताळणी व मांडणी यांसह विविध बाबींची माहिती देण्यात आली. नकाशा वाचनाची प्रात्यक्षिके व त्यांचा सराव राजाराम तलाव येथे करण्यात आला. प्रशिक्षणादरम्यान कॅडेट्सना प्रत्यक्ष सरावाची संधी देण्यात आल्याने विषय अधिक प्रभावीपणे समजून घेण्यास मदत झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट दीक्षा शिराळे यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय CPL प्रार्थना मोरे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार CTO डॉ. नम्रता नरेवाडीकर यांनी मानले. यावेळी Ex-ANO सुनीता भोसले, हवालदार सणगर उपस्थित होते. कार्यशाळेला कॅडेट्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एन.सी.सी. चे कमांडिंग ऑफिसर कर्नल विक्रम नलवडे, रजिस्ट्रार श्री सचिन धनवडे यांचे प्रोत्साहन लाभले.
विवेकानंद कॉलेज मध्ये ‘नकाशा वाचन’ मार्गदर्शन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
|