बातम्या
महापालिकेच्या विशेष नाव हस्तांतरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
By nisha patil - 7/31/2026 1:38:58 PM
Share This News:
महापालिकेच्या विशेष नाव हस्तांतरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
१८६ अर्जांवर तात्काळ कार्यवाही
कोल्हापूर, ता. ३० : कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागामार्फत शहरातील मिळकतधारकांच्या सोयीसाठी चारही विभागीय कार्यालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष एकदिवसीय मिळकत नाव हस्तांतरण शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सदरचे शिबीर आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार उपआयुक्त परितोष कंकाळ व कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे यशस्वीरीत्या पार पडले.
या शिबिरामध्ये एकूण १८६ नाव हस्तांतरण अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी विभागीय कार्यालय क्र. १ गांधी मैदान अंतर्गत ८५, विभागीय कार्यालय क्र. २ छत्रपती शिवाजी मार्केट अंतर्गत ३५, विभागीय कार्यालय क्र. ३ राजारामपुरी अंतर्गत २२ आणि विभागीय कार्यालय क्र. ४ छत्रपती ताराराणी मार्केट अंतर्गत ४४ अर्ज प्राप्त झाले. प्राप्त अर्जांपैकी विभागीय कार्यालय क्र. २ मधील दोन अर्जांवर संबंधित मिळकतीचा कर थकीत असल्यामुळे कार्यवाही प्रलंबित ठेवण्यात आली. उर्वरित सर्व अर्जांची कागदपत्रे समक्ष तपासून त्याच दिवशी नाव हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तसेच संबंधित मिळकतधारकांना नाव हस्तांतरणाचे प्रमाणपत्रही तत्काळ प्रदान करण्यात आले. या विशेष शिबिरामध्ये नाव हस्तांतरण शुल्कापोटी खरेदी दस्ताच्या मूल्याच्या ०.१ टक्के शुल्क तसेच वारसा हक्काच्या प्रकरणांमध्ये रु.१,५५० प्रमाणे शुल्क आकारण्यात आले. या माध्यमातून महानगरपालिकेकडे एकूण रु.६,१५,४४३ इतका महसूल जमा झाला.
महापालिकेच्या विशेष नाव हस्तांतरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
|