बातम्या
पन्हाळ्याच्या कराटे पटूंची राज्यस्तरावर झेप; झिदान फरास सुवर्णपदकाचा मानकरी, उरेज आगा कांस्यपदक विजेता
By nisha patil - 7/9/2026 5:42:36 PM
Share This News:
पन्हाळ्याच्या कराटे पटूंची राज्यस्तरावर झेप; झिदान फरास सुवर्णपदकाचा मानकरी, उरेज आगा कांस्यपदक विजेता
पन्हाळा प्रतिनिधी : शहाबाज मुजावर पन्हाळ्याच्या क्रीडा क्षेत्राला अभिमान वाटावा, अशी कामगिरी येथील दोन युवा कराटेपटूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत करून दाखवली आहे. १२ व्या राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत झिदान नवाज फरास याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले, तर उरेज वसिम आगा याने दमदार कामगिरी करत कांस्यपदक मिळवले. दोन्ही खेळाडूंनी हिरवा बेल्ट गटात सहभाग घेतला होता.
स्पर्धेतील विविध फेऱ्यांमध्ये झिदानने आत्मविश्वासाने खेळ करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. त्याच्या तंत्रशुद्ध खेळामुळे सुवर्णपदकावर नाव कोरण्यात त्याला यश आले. उरेजने ही आपल्या खेळातील कौशल्य, वेग आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर कांस्यपदक मिळवले. या दोन्ही खेळाडूंना प्रशिक्षक निलेश पवार,रोशनी पवार तर चुलते तबरेज फरास यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
राज्यस्तरीय स्पर्धेत मिळवलेले हे यश दोन्ही खेळाडूंच्या कठोर मेहनतीचे आणि सातत्यपूर्ण सरावाचे फलित आहे. त्यांच्या यशामागे प्रशिक्षकांचे मार्गदर्शन तसेच पालकांचे प्रोत्साहन आणि पाठबळ महत्त्वाचे ठरले.
झिदान आणि उरेज यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे पन्हाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून क्रीडाप्रेमी, नागरिक आणि मित्रपरिवारातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही दोन्ही खेळाडू पन्हाळ्याचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
पन्हाळ्याच्या कराटे पटूंची राज्यस्तरावर झेप; झिदान फरास सुवर्णपदकाचा मानकरी, उरेज आगा कांस्यपदक विजेता
|