बातम्या
पन्हाळा पोलिसांची ऑनलाइन मुंबई मटका जुगारावर कारवाई; १ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त
By nisha patil - 8/27/2026 11:29:58 PM
Share This News:
पन्हाळा पोलिसांची ऑनलाइन मुंबई मटका जुगारावर कारवाई; १ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त
पन्हाळा, प्रतिनिधी : मौजे तिरपण येथे ऑनलाइन पद्धतीने मुंबई मटका जुगार चालविणाऱ्या एकावर पन्हाळा पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत आकडेवारीची बुक, गुगल-पे स्कॅनर, सहा मोबाईल फोन आणि लॅपटॉप असा एकूण १ लाख ६१ हजार २१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.शुभम यशवंत जाधव (वय २९, रा. तिरपण, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) असे कारवाईतील आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तिरपण येथे यशवंत गणपती जाधव यांच्या बांधकाम सुरू असलेल्या नवीन घराच्या पाठीमागे आडोशाला शुभम जाधव ऑनलाइन मुंबई मटका जुगार चालवत होता. तो ऑनलाइन पैसे स्वीकारून मटका जुगाराचे अंक घेत असल्याचे आढळून आले. तसेच युट्यूबवरील ‘महाकाल’ चॅनेलच्या माध्यमातून जुगाराशी संबंधित माहितीचा वापर करीत असल्याचेही निदर्शनास आले.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र कांबळे यांच्या फिर्यादीवरून पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६५/२०२६, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक एम. एम. नाईक करीत आहेत.
पन्हाळा पोलिसांची ऑनलाइन मुंबई मटका जुगारावर कारवाई; १ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त
|