बातम्या

वयाच्या ५५ व्या वर्षी एलएलबी उत्तीर्ण; ॲड. नारायण पोवार यांचा राजे ग्रुपकडून भव्य सत्कार

Passed LLB at the age of 55


By nisha patil - 7/29/2026 1:53:01 PM
Share This News:



वयाच्या ५५ व्या वर्षी एलएलबी उत्तीर्ण; ॲड. नारायण पोवार यांचा राजे ग्रुपकडून भव्य सत्कार
 

कागल प्रतिनिधी अजित बोडके शेंडूर : जिद्द, चिकाटी आणि संघर्षाला वयाचे कोणतेही बंधन नसते, याची प्रेरणादायी प्रचिती शेंडूर गावचे सुपुत्र ॲड. नारायण गुंडू पोवार यांनी करून दिली आहे. वयाच्या ५५ व्या वर्षी अथक परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी एलएलबी (कायद्याची पदवी) यशस्वीपणे संपादन करत वकिली क्षेत्रात प्रवेश केला.
 

सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे, गोरगरिबांच्या न्यायासाठी अनेक आंदोलने, मोर्चे आणि लोकहिताच्या लढ्यांचे नेतृत्व करणारे पोवार आता कायद्याच्या माध्यमातूनही सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज झाले आहेत. वाढत्या वयात मिळवलेले हे यश युवकांसह सर्व समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
 

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शेंडूर येथील श्री दत्त मंदिरात राजे ग्रुपच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
 

यावेळी बोलताना मान्यवरांनी, "ध्येय निश्चित असेल तर वय हा कधीच अडथळा ठरत नाही. ॲड. नारायण पोवार यांचे यश समाजासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे," असे गौरवोद्गार काढले.
राजे ग्रुप व समस्त शेंडूर ग्रामस्थांनी ॲड. नारायण गुंडू पोवार यांना वकिली क्षेत्रातील यशस्वी कारकीर्द आणि जनसेवेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

 


वयाच्या ५५ व्या वर्षी एलएलबी उत्तीर्ण; ॲड. नारायण पोवार यांचा राजे ग्रुपकडून भव्य सत्कार
Total Views: 34