बातम्या

गोकुळच्या ६६७ दूध संस्थांना मतदानाचा मार्ग मोकळा; गडहिंग्लजमध्ये सत्ताधारी गटाकडून जल्लोष

Path cleared for 667 Gokul milk societies to vote


By nisha patil - 3/9/2026 11:35:50 PM
Share This News:



गोकुळच्या ६६७ दूध संस्थांना मतदानाचा मार्ग मोकळा; गडहिंग्लजमध्ये सत्ताधारी गटाकडून जल्लोष

उच्च न्यायालयाने अवसायनातील ४९२ दूध संस्था आणि कार्यक्षेत्राबाहेरील ठरावधारक म्हणून तक्रार झालेल्या १७५ दूध संस्था, अशा एकूण ६६७ दूध संस्थांच्या मतदानाच्या पात्रतेबाबत निकाल दिला. या निकालानंतर गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी गडहिंग्लज दौऱ्यावर असलेल्या सत्ताधारी संचालक मंडळातील नेत्यांनी आनंद व्यक्त केला.

माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील (आबाजी), माजी अध्यक्ष नविद मुश्रीफ, संचालक युवराज पाटील (बापू), अजित नरके, डॉ. सुजित मिणचेकर, नंदकुमार ढेंगे, बाळासाहेब खाडे, रणजितसिंह पाटील, किसन चौगले, अमरसिंह पाटील आणि एस. आर. पाटील यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश पाटील-गिजवणेकर, राहुल शिरकोळी, विजय दाभाडे आणि शिवराज पाटील यांनी या निकालाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला.

या निकालामुळे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील संबंधित दूध संस्थांच्या मतदानाचा प्रश्न महत्त्वाचा ठरणार असून, सत्ताधारी गटाला यामुळे मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.


गोकुळच्या ६६७ दूध संस्थांना मतदानाचा मार्ग मोकळा; गडहिंग्लजमध्ये सत्ताधारी गटाकडून जल्लोष
Total Views: 20