बातम्या

पवित्र उमरा यात्रेसाठी मुराद यांना रवळनाथ पत संस्थेतर्फे शुभेच्छा*

Pavitra


By nisha patil - 8/24/2026 7:29:35 PM
Share This News:



**पवित्र उमरा यात्रेसाठी मुराद यांना रवळनाथ पत संस्थेतर्फे शुभेच्छा*

**आजरा(हसन तकीलदार)*:-श्री रवळनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संचालक मजीद मुराद हे पवित्र उमरा यात्रेसाठी मक्का मदीना येथे प्रस्थान करीत असल्याने त्यांच्या या धार्मिक यात्रेनिमित्त संस्थेच्यावतीने त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुराद यांचा संस्थेचे व्हा. चेअरमन समीर गुंजाटी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे चेअरमन अभिषेक शिंपी म्हणाले, “उमरा ही अत्यंत पवित्र धार्मिक यात्रा असून, या यात्रेसाठी मजीद मुराद यांना जाता येत आहे, ही आनंदाची बाब असून त्यांची प्रार्थना व दुआ सर्वांसाठी मंगलमय ठराव्यात, अशा मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी व्हा. चेअरमन समीर गुंजाटी यांनीही मुराद यांना यात्रेसाठी शुभेच्छा देत, “ही पवित्र यात्रा त्यांच्यासाठी आध्यात्मिक समाधान आणि आनंद देणारी ठरो,” अशी सदिच्छा व्यक्त केली. याचबरोबर कार्यक्रमात मुराद यांच्या उमरा यात्रेसाठी सर्वांनी शुभेच्छा देत त्यांचा सुखरूप प्रवास व पवित्र यात्रा पूर्ण होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. मजीद मुराद यांनी संस्थेच्या सर्व पदाधिकारी, संचालक व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार व्यक्त केले. 

यावेळी संस्थेचे चेअरमन अभिषेक शिंपी, संचालक किरण कांबळे, विक्रम पटेकर, इब्राहिम इंचनाळकर, युसूफ गवसेकर, सिकंदर दरवाजकर, महंमदरसुल आगा, हुसेन दरवाजकर, मॅनेजर विश्वास हरेर यांच्यासह संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.


पवित्र उमरा यात्रेसाठी मुराद यांना रवळनाथ पत संस्थेतर्फे शुभेच्छा*
Total Views: 428