बातम्या

*आजऱ्यातील  शांततापूर्वक बंद यशस्वी

Peaceful shutdown in Ajra successful


By nisha patil - 7/23/2026 3:26:57 PM
Share This News:



*आजऱ्यातील  शांततापूर्वक बंद यशस्वी
 

*आजरा(हसन तकीलदार):-दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे संविधानिक मार्गाने शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ दिनांक 23 जुलै 2026 रोजी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला आजरा तालुक्यातील  व्यापारी संघटना, सर्व व्यापारी बांधव तसेच सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद दिला.आणि शांतता पूर्वक बंद यशस्वी केला.
 

या बंदला सहकार्य करून सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिल्याबद्दल वंचित बहुजन युवा आघाडी, आजरा यांच्या वतीने आजरा तालुक्यातील  व्यापारी संघटना, सर्व व्यापारी बांधव आणि सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेश नार्वेकर, संघटनेतील सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि बंद यशस्वी केला.
 

या सर्वांचे हे सहकार्य अन्यायाविरुद्ध लोकशाही मार्गाने लढण्याची ताकद अधिक बळकट करणारे आहे असे सांगण्यात आले.
बंदच्या अनुषंगाने वचित बहुजन युवा आघाडी. जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय कांबळे, तालुका अध्यक्ष संतोष मासोळे, आय टी.प्रमुख भिकाजी कांबळे. कॉ. काशिनाथ मोरे, रुपाली कांबळे, सेक्युलर मुव्हमेंट जिल्हा अध्यक्ष अजय देशमुख यांनी  यावेळी आपली मनोगते व्यक्त केली .यावेळी प्रवीण कश्यप,शाखा अध्यक्ष राहूल शिपूरकर, काशिनाथ कांबळे, रिपब्लीकन सेना जिल्हा उपाध्यक्ष सुरेश दिवेकर, तालुका अध्यक्ष-अविनाश कांबळे होण्याळकर, सुधीर कांबळे, राहुल कांबळे तसेच तालुक्यातून शिव शाहू, फुले आंबेडकर,पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते, अनुयायी  उपस्थीत होते.


*आजऱ्यातील  शांततापूर्वक बंद यशस्वी
Total Views: 631