बातम्या

शहाजी महाविद्यालयात शनिवारी कवी संमेलन व चर्चासत्र

Poets conference and discussion session on Saturday


By nisha patil - 8/25/2026 1:39:28 PM
Share This News:



शहाजी महाविद्यालयात शनिवारी कवी संमेलन व चर्चासत्र

 कोल्हापूर : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र दिनमान कोल्हापूर आणि श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील मराठी विभाग व आय क्यू ए सी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनमान साहित्य उत्सवांतर्गत कवी संमेलन व चर्चासत्र  शनिवार दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे. या कवी संमेलनात व चर्चासत्रात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण व दिनमानचे संपादक डॉ. विजय चोरमारे यांनी केले आहे. 
   

या कवी संमेलनात निमंत्रित कवी म्हणून पाटलोबा पाटील, विक्रम राजवर्धन, मंदार पाटील ,आनंद रंगराज, डॉ. विजय चोरमारे, डॉ चंद्रकांत पोद्दार, विष्णू पावले, डॉ.डी.के.वळवी, शहाजी महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक आणि नवोदित कवी या कवी संमेलनात सहभागी होणार आहेत व ते स्वरचित कविता सादर करणार आहेत.  शहाजी महाविद्यालयातील कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे सभागृहात हा कवी संमेलनाचा कार्यक्रम शनिवारी सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे.
   

श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या  उपक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन आहे लाभले आहे.


शहाजी महाविद्यालयात शनिवारी कवी संमेलन व चर्चासत्र
Total Views: 35