बातम्या

सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची नजर; ६० जणांना शहापुरी पोलीस ठाण्यात हजर

Police keep a close watch on habitual offenders


By nisha patil - 5/9/2026 5:08:36 PM
Share This News:



सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची नजर; ६० जणांना शहापुरी पोलीस ठाण्यात हजर
 

कोल्हापूर : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या आदेशानुसार शहर विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहापुरी पोलीस ठाण्यात ६० सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांना हजर करण्यात आले.
 

यावेळी संबंधित गुन्हेगारांकडून त्यांच्या गुन्ह्यांची माहिती घेण्यात आली. आगामी गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडू नये किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना सक्त सूचना देण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर प्रतिबंधात्मक कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला.
या कारवाईत शहापुरी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी व राजवाडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अधिकारी व पोलीस कर्मचारी सहभागी झाले.


सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची नजर; ६० जणांना शहापुरी पोलीस ठाण्यात हजर
Total Views: 16