बातम्या
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद; प्रकाश पाटलांचा वाढदिवस जल्लोषात
By nisha patil - 10/9/2026 1:29:27 PM
Share This News:
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद; प्रकाश पाटलांचा वाढदिवस जल्लोषात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रकाश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रकाश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. यामध्ये शिवसेना नेते तथा खासदार विनायक राऊत, खासदार संजय राऊत, आमदार भास्कर जाधव तसेच शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दूधवडकर यांच्यासह अनेक नेतेमंडळींचा समावेश होता.
दरम्यान, प्रकाश पाटील यांचे शिवसैनिक समर्थक आणि कार्यकर्त्यांनीही मुंबईत त्यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहून प्रकाश पाटील यांना शुभेच्छा देत त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. मातोश्रीवर पक्षप्रमुखांचा आशीर्वाद आणि ज्येष्ठ नेत्यांच्या शुभेच्छांमुळे प्रकाश पाटील यांचा वाढदिवस राजकीयदृष्ट्याही चर्चेचा ठरला.
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद; प्रकाश पाटलांचा वाढदिवस जल्लोषात
|