बातम्या
कोल्हापूरचा अभिमान! सन्मित्र विद्यालयाच्या युध्दवीर मानेने शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात मिळवला दहावा क्रमांक
By nisha patil - 8/17/2026 11:30:20 PM
Share This News:
कोल्हापूरचा अभिमान! सन्मित्र विद्यालयाच्या युध्दवीर मानेने शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात मिळवला दहावा क्रमांक
कागल प्रतिनिधी : अजित बोडके कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सरकारच्या इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये सन्मित्र विद्यालय, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत विद्यालयाचा विद्यार्थी चि. युध्दवीर इंद्रजीत माने याने ३०० पैकी तब्बल २७६ गुण मिळवत राज्यात दहावा क्रमांक पटकावला असून शिष्यवृत्तीचा मान मिळवला आहे.
युध्दवीरने हे यश कोणत्याही खासगी क्लासशिवाय केवळ घरच्या घरी अभ्यास करून संपादन केले आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमागे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच त्याचे वडील इंद्रजीत माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या परीक्षेत सन्मित्र विद्यालयाचे एकूण ८ विद्यार्थी गुणवत्ताधारक ठरले आहेत.
गुणवंत विद्यार्थ्यांची यादी
१. युध्दवीर इंद्रजीत माने – २७६ गुण – राज्यात १० वा क्रमांक
२. मिथिलेश सुशांत बकरे – २६६ गुण – जिल्ह्यात ५७ वा क्रमांक
३. ओवी आनंदा पाटील – २६० गुण – जिल्ह्यात ९९ वा क्रमांक
४. अद्वैत अभिजीत पोतदार – २५० गुण
५. अर्णव स्वप्नील कुलकर्णी – २४८ गुण
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे सन्मित्र विद्यालयाच्या शैक्षणिक लौकिकात आणखी भर पडली आहे.
युध्दवीर मानेच्या दैदिप्यमान यशाबद्दल त्याचे पालक, शिक्षक, मित्रपरिवार तसेच विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याच्या या यशामुळे कोल्हापूरच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला आहे.
कोल्हापूरचा अभिमान! सन्मित्र विद्यालयाच्या युध्दवीर मानेने शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात मिळवला दहावा क्रमांक
|