व्यंकटराव मध्ये एस.एस.सी. परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण
By nisha patil - 7/18/2026 10:24:55 PM
Share This News:
व्यंकटराव मध्ये एस.एस.सी. परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण
*आजरा(हसन तकीलदार)*:-व्यंकटराव हायस्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष सन 2025- 26 मधील सर्व गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. एसएससी मार्च 2026, शिष्यवृत्ती परीक्षा, एन.एम.एम.एस.परीक्षा अशा विविध स्तरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.. "बहुजनांच्या शाळेतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे खरोखरच कौतुकास्पद आहे" असे गौरवोद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष व आजरा महाल शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष के. जी.पटेकर यांनी काढले. प्राचार्य संजयकुमार पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक करून शाळेच्या गौरवशाली इतिहासाची परंपरा अबाधित ठेवण्याचे आवाहन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन झाले. प्रणव भगवान पाटील (प्रथम क्रमांक,) जुवेरीया समीर शेख( द्वितीय क्रमांक) सिमरन भिकाजी पाटील (तृतीय क्रमांक) शलाका ओमकार गिरी (चतुर्थ क्रमांक) साक्षी शिवाजी राणे (पाचवा क्रमांक,) तसेच प्रेम रमेश येसणे या एसएससी परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सत्कार करणेत आला. तसेच मराठी, हिंदी, इंग्रजी ,गणित ,विज्ञान, समाजशास्त्र, संस्कृत, चित्रकला, शारीरिक शिक्षण या विषयातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
अनुष्का हरेर, श्रीश मुळीक, मैथिली माडभगत , तन्मय सहदेव पाटील, आर्या सुतार, तनिष्का कालेकर, रुषा देसाई, अदिती नरके, माधवी आजगेकर, सलोनी गुरव, गौरी देसाई,मधुरा माने,कार्तिक हुबळे, ऋतुजा गिलबिले, वेदिका पाटील, गौरी पाटील, सुजल सिमने, चैतन्य वडवळे, शालीका राठोड, यशराज कुंभार,संचालि सुतार, दर्शना सुतार,सृष्टी तेजम, गायत्री सुतार,याचबरोबर पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता पात्र विद्यार्थी स्वरा मोटे,शोर्य आजगेकर, 8वी शिष्यवृत्ती परीक्षा व एन.एम.एम.एस.परीक्षेत यश संपादन केलेल्या वेदांग शिंदे, गझल मुल्ला, सिद्धी होरटे, तनिष्क देसाई याही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.इयत्ता 5वी ते 9वीतील मुलीत प्रथम येणाऱ्या अंजली भांदुगरे, अर्णवी कामत, स्वर्निका खामकर,आर्या गिलबिले,आर्या कांबळे विद्यार्थिनींचाही गौरव करणेत आला.आजरा केंद्रात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.( खादिजा मुल्ला, गतिमा अडकूरकर, संदेश देसाई, सिद्धेश गुरव.)मार्गदर्शक शिक्षक शिक्षिका एस.डी.इलगे, व्ही. टी.कांबळे, एन.ए.मोरे, एस.एस. कुंभार, ए.डी.पाटील,व्ही. एच.गवारी, एस. एस. गिलबिले, एम.एस.शिंपी,एस. टी. पाटील, आर.पी.पाटील,एम.एस. पाटील,ऐ.के.गुरव, एम एस. पाटील,एम. एम.यलगार,एस.वाय. भोये,एम.व्ही.बिल्ले , कृष्णा दावणे,एस.एम.पाटील , पी. व्ही.पाटील,सौ. व्ही.ए.वडवळेकर, के.बी.खोत, ए.वाय.चौगुले ,एस.बी.पाटील , व्ही. पी.गावडे , अभिजीत देसाई, प्रकाश पाटील -आरदाळकर ,प्रताप कापडुस्कर या मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. माजी शिक्षक व दाते ए.के.पावले, एस.जी. इंजल, यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व दात्यांचे नामोल्लेख वाचन सौ.आशा गुरव यांनी केले. सूत्रसंचालन रामदास होरटे व आभार सौ.ए.डी. पाटील यांनी मानले.
कार्यक्रमाचे नेटके नियोजन पर्यवेक्षका सौ. व्ही.जे.शेलार, सौ.एस. डी. इलगे व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. या कार्यक्रमासाठी आजरा महाल शिक्षण मंडळाचे संचालक सचिन शिंपी, सुधीर जाधव, पांडुरंग जाधव, विलास पाटील, आदम इंचनाळकर माजी शिक्षक जी.बी.ढेकळे तसेच हितचिंतक उपस्थित होते
व्यंकटराव मध्ये एस.एस.सी. परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण
|