बातम्या

शहाजी  महाविद्यालयात ऑर्गॅनिक केमिकल प्रोडक्ट्स’  निर्मिती  व प्रदर्शन  संपन्न 

Production and exhibition


By nisha patil - 8/27/2026 4:15:47 PM
Share This News:



शहाजी  महाविद्यालयात ऑर्गॅनिक केमिकल प्रोडक्ट्स’  निर्मिती  व प्रदर्शन  संपन्न 
 

विद्यार्थ्यांनी घेतले रसायनशास्त्रातून उद्योजकतेचे धडे 

कोल्हापूर : श्री शाहू शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने ‘केमस्पेक्टरम स्टडी कॉर्नर’चे उद्घाटन तसेच ‘ऑर्गॅनिक केमिकल प्रोडक्ट्स’ प्रदर्शन उत्साहात पार पडले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांच्या शुभहस्ते स्टडी कॉर्नरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी IQAC समन्वयक डॉ. मांडणीकर, प्रबंधक श्री. रवींद्र भोसले, अधीक्षक श्री. मनीष भोसले आणि विज्ञान विभागप्रमुख प्रा. मगदूम-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. 

रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. मनोज सं. कांबळे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनी घेतलेले परिश्रम, वेळेचे नियोजन, जिद्द, सातत्य आणि सर्जनशीलतेचे त्यांनी कौतुक केले.

प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी हँड सॅनिटायझर, हर्बल साबण, हर्बल फेसवॉश, धूप, परफ्युम तसेच विविध ऑर्गॅनिक व हर्बल उत्पादने तयार करून मांडली. उत्पादननिर्मितीमध्ये कच्च्या मालाची निवड, योग्य प्रमाण, गुणवत्ता, सुरक्षितता, पॅकेजिंग आणि सादरीकरण यांचा शास्त्रीय पद्धतीने विचार करण्यात आला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेतील ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध जोडण्याबरोबरच उत्पादननिर्मिती, कौशल्यविकास आणि उद्योजकतेचा अनुभव मिळाला. रसायनशास्त्राच्या माध्यमातून दैनंदिन जीवनातील समस्यांसाठी नैसर्गिक व पर्यावरणपूरक पर्याय निर्माण करता येतात, हा संदेश या प्रदर्शनातून देण्यात आला.

कार्यक्रमास रसायनशास्त्र विभागातील सुमारे ९० विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या अभिनव आणि रोजगाराभिमुख प्रयत्नांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.


शहाजी  महाविद्यालयात ऑर्गॅनिक केमिकल प्रोडक्ट्स’  निर्मिती  व प्रदर्शन  संपन्न 
Total Views: 19