बातम्या

प्रा.सुधाकर मानकर यांचे कार्य सर्वांनाच दिशादर्शक : डॉ प्रकाश कुंभार 

Prof Sudhakar Mankars work


By nisha patil - 7/23/2026 6:31:33 PM
Share This News:



प्रा.सुधाकर मानकर यांचे कार्य सर्वांनाच दिशादर्शक : डॉ प्रकाश कुंभार 

प्रा.सुधाकर मानकर : व्यक्ती, विचार व कार्य यावर शहाजी महाविद्यालयात स्मृती व्याख्यान संपन्न 

कोल्हापूर : प्रा.सुधाकर मानकर  हे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, लेखन क्षेत्रात आणि आरोग्याच्या बाबतीत यशस्वी झालेले व्यक्तिमत्व होते.त्यांचे हे कार्य सर्व समाजालाच दिशादर्शक आणि प्रेरणादायी  असे आहे असे प्रतिपादन  तिसंगी येथील म.ह. शिंदे महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ.प्रकाश कुंभार यांनी केले. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात आय क्यू ए सी विभागाच्या वतीने आयोजित प्रा. सुधाकर मानकर स्मृती व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाचे   अध्यक्षस्थानी होते. 
   

प्रा.प्रकाश कुंभार म्हणाले, प्रा. सुधाकर मानकर शब्दात आणि कोणतेही चौकटीत न मावणारे व्यक्तिमत्व होते. शिक्षण क्षेत्रात सत्याचा मार्ग अनुसरून त्यावर चालणारे हे व्यक्तिमत्व होते. विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी यांच्यासाठी त्यांनी मोठे लेखन कार्य केले. अध्ययन, अध्यापनाबरोबरच पन्नास वर्षाहून अधिकचा कालावधी त्यांनी शिक्षकांच्या प्रश्नासाठी संघटनेत घालवला. माणूस म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व खूपच मोठे होते. अनेक प्रश्नांवरती अभ्यासपूर्ण व रोखठोक भाषेत त्यांनी प्रश्न मांडले. त्यांच्या ह्या कामाला सत्याची आणि न्यायाची बाजू होती.

आमच्यासारखे शेकडो प्राध्यापक त्यांच्यामुळे उभे राहिले. मानकर सरांनी अनेक विद्यार्थी शहाजी महाविद्यालयातून घडवले. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम केले. सुटा संघटनेच्या कार्यात त्यांचा आणि जाधव सरांचा खूप मोठा वाटा आहे. प्रा. सुधाकर मानकर यांच्यासारखे व्यक्तिमत्व आता होणे नाही. त्यांनी आर्थिक ,सामाजिक,शैक्षणिक ,क्षेत्रात दीपस्तंभा सारखे काम केले. त्यांचे हे कार्य चिरंतर, प्रेरणादायी राहील.  श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था आणि श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयामध्ये त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचे कार्य हे खूप मौलिक आहे. 
   

प्राचार्य डॉ.आर के शानेदिवाण म्हणाले, प्रा. सुधाकर मानकर यांच्या प्रति कृतज्ञता  व्यक्त करण्यासाठी या स्मृती व्याख्यानाचे आयोजन केले आहे. त्यांच्यातील शिस्तप्रिय आणि संवेदनशील माणूस नेहमी सर्वांना आवडतो. सुटा संघटनेने त्यांचे कार्य चिरंतन ठेवण्यासाठी भरीव स्वरूपाचे काम करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शहाजी महाविद्यालयाच्या विकासात मानकर सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या या योगदानामुळेच महाविद्यालयाल विकसित झाले. 
 

श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. आय क्यू ए सी समन्वयक डॉ.आर.डी.मांडणीकर यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. स्टाफ सेक्रेटरी डॉ. के. एम. देसाई यांनी आभार मानले. प्रा. पी. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. 
 

 महाविद्यालयाचे अधीक्षक श्री मनीष भोसले डॉ. ए. बी. बलुगडे, डॉ. अतुल मानकर, डॉ. दीप्ती मानकर, डॉ बोजगर सर, प्रा. डॉ. कोरबू सर, भोगावती महाविद्यालयातील प्रा. रावजी पाटील, शहाजी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
प्रा .सुधाकर मानकर यांच्या 32 पुस्तकांचे यावेळी शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन संपन्न झाले. त्यांच्यावरील विविध बातम्यांचेही यावेळी प्रदर्शन झाले.


प्रा.सुधाकर मानकर यांचे कार्य सर्वांनाच दिशादर्शक : डॉ प्रकाश कुंभार 
Total Views: 16