बातम्या

शेंडा पार्कमधील बैठकीत घेतला कामाच्या प्रगतीचा आढावा

Progress of work reviewed at a meeting in Shenda Park


By nisha patil - 7/18/2026 10:14:49 PM
Share This News:



होमिओपॅथी, आयुर्वेदिक, योगा या महाविद्यालयांसह व ग्रामीण आरोग्य पथक परिसरातील अत्यावश्यक सुविधा जलदगतीने उभारा
       
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना 
          
शेंडा पार्कमधील बैठकीत घेतला कामाच्या प्रगतीचा आढावा

       
कोल्हापूर, दि. १८: मौजे सांगाव येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय, पिंपळगाव खुर्द येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, उत्तर येथील शासकीय योगा महाविद्यालय व रुग्णालय या महाविद्यालयांसह कागल येथील ग्रामीण आरोग्य पथक परिसरातील अत्यावश्यक सुविधा जलदगतीने उभारा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. या परिसरातील पाणी, वीज, रस्ते, एसटीपी प्लांट या अत्यावश्यक सुविधांबाबत सतर्क रहा, असेही ती म्हणाले.
           
मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेंडा पार्कमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.                  
यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी प्रगतीपथावर असलेली सर्वच कामे तातडीने आणि वेळेत पूर्ण करण्याच्याही सूचना दिल्या. पाणी, वीज, रस्ते, एसटीपी प्लांट या अत्यावश्यक सोयी-सुविधांकडे बारकाईने लक्ष देण्याच्या आणि तातडीने प्रस्ताव पाठवण्याच्या सूचनाही श्री. मुश्रीफ यांनी दिल्या.           
           
आढावा बैठकीला राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, शासकीय आयुर्वेदिक व होमिओपॅथी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिजीत अहिरे, उत्तूर येथील शासकीय योगा व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. भाग्यश्री खोत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरूड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिरजकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता  हजारे,  शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे बांधकाम सल्लागार  तायवाडे-पाटील, होमिओपॅथी महाविद्यालयातील एअरबॉन्ड लिमिटेडचे  शेळके आदी अधिकारी उपस्थित होते.


शेंडा पार्कमधील बैठकीत घेतला कामाच्या प्रगतीचा आढावा
Total Views: 8