बातम्या
आमदार राजेंद्र पाटील समर्थकांकडून माजी सैनिकाना मारहाण झाल्याबद्दल निषेध फेरी व गावबंद आंदोलन
By nisha patil - 10/8/2026 12:39:10 PM
Share This News:
आमदार राजेंद्र पाटील समर्थकांकडून माजी सैनिकाना मारहाण झाल्याबद्दल निषेध फेरी व गावबंद आंदोलन
सैनिक टाकळी प्रस्तावित एमआयडीसी विरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सिद्धेश्वर देवालय जयसिंगपूर या ठिकाणी बैठक घेण्याचे ठरलेलं होतं त्याप्रमाणे आमदारांच्या कडून पाच माणसं आणि आंदोलकांच्या कडे हात माणस बैठक होती पण आमदारांनी मी एमआयडीसी करणारच असा अट्टाहास केल्यामुळे आंदोलकांनी बैठकीचा त्याग करून तिथून जावयास निघाले असता. डबा धरून बसलेल्या आमदार साहेबांच्या समर्थकांकडून गाडी चढत असताना गाडीवर हल्ला केला माजी सैनिकांना शेतकऱ्यांना काठीने मारहाण करण्यात आली.
राष्ट्रवादीचा आव्हान करणे आणि माजी सैनिकांना मारहाण करणे या घटनेच्या निषेधार्थ निषेधार्थ आज सैनिक टाकळी गाव पूर्णपणे सर्व व्यवहार बंद ठेवत गावातून निषेदाची फेरी काढण्यात आली. यावेळी सकल मराठा समाजाचे अमर पाटील संभाजी ब्रिगेडचे विकास पाटील हनुमंत पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विजय पाटील महादेव पाटील सतीश सावंत सुरेश गोते आत्माराम पाटील राजेश पाटील शामराव पाटील अशोक पाटील रणजीत पाटील सुहास पाटील सोपान पाटील यांच्यासह अनेक माजी सैनिक शेतकऱ्यासह महिलावर्ग मोठ्या संख्येनेउपस्थित होते.
आमदार राजेंद्र पाटील समर्थकांकडून माजी सैनिकाना मारहाण झाल्याबद्दल निषेध फेरी व गावबंद आंदोलन
|