बातम्या

महसूल अधिकाऱ्यांची ‘जनता भेट’ ठरली! रोज ३ ते ५ वेळ राखीव

Public Meeting Slots Fixed for Revenue Officials


By nisha patil - 10/9/2026 1:27:03 PM
Share This News:



महसूल अधिकाऱ्यांची ‘जनता भेट’ ठरली! रोज ३ ते ५ वेळ राखीव

नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणी थेट ऐकून घेण्यासाठी राज्य शासनाने महसूल अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे जिल्हाधिकाऱ्यांपासून नायब तहसीलदारांपर्यंत सर्व महसूल अधिकाऱ्यांना प्रत्येक कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी ३ ते सायंकाळी ५ ही वेळ नागरिकांच्या भेटीसाठी राखीव ठेवावी लागणार आहे.

विशेष म्हणजे या दोन तासांच्या कालावधीत कोणत्याही अंतर्गत बैठका किंवा व्हीसी घेता येणार नाहीत. नागरिकांच्या भेटी आणि तक्रारींची नोंद करण्यासाठी कार्यालयात मध्यवर्ती नोंदवही ठेवणे बंधनकारक असेल. तसेच ३ ते ५ ही राखीव वेळ कार्यालयाच्या प्रवेशद्वारासह अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठळकपणे दर्शवावी लागणार आहे.

अत्यंत तातडीचे शासकीय काम, दौरा किंवा मंत्र्यांची बैठक असल्यामुळे अधिकारी उपस्थित राहू शकत नसतील, तर त्याची पूर्वकल्पना सूचना फलकावर देणे आणि नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यासाठी पर्यायी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करणे बंधनकारक राहणार आहे. आता नागरिकांच्या तक्रारींसाठी महसूल कार्यालयात दररोज ३ ते ५ हा वेळ खास जनतेसाठी!


महसूल अधिकाऱ्यांची ‘जनता भेट’ ठरली! रोज ३ ते ५ वेळ राखीव
Total Views: 6