बातम्या

सबलानी दुर्बलांचे रक्षण करणे हाच रक्षाबंधनाचा मुख्य हेतू : उपप्राचार्य दिलीप संकपाळ*

Rakshabandhan


By nisha patil - 8/29/2026 1:45:10 PM
Share This News:



*सबलानी दुर्बलांचे रक्षण करणे हाच रक्षाबंधनाचा मुख्य हेतू : उपप्राचार्य दिलीप संकपाळ*

*आजरा(हसन तकीलदार)*-: आजरा महाविद्यालय आजरा येथे कनिष्ठ विभागात भावा-बहिणीच्या अतूट नात्याचे दर्शन घडवणारा रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिलीप संकपाळ होते .

     सुरुवातीला विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना राख्या बांधल्या व औक्षण केले . त्यानंतर कु.तमन्ना जमाल, कु. साक्षी कांबळे , नागेश गाडीवड्ड,कु स्मिता अडसूळ,कु. जागृती ठोकळे ,कु. श्रावणी वाजंत्री या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनावर आपले मनोगत व्यक्त केले . कु. आर्या जाधव,कु तनुजा पाटील व कु. साक्षी जाधव यांनी रक्षाबंधन सणावर गीते सादर केली . यावेळी प्रा. अनिल निर्मळे, व प्रा.रत्नदीप पोवार या शिक्षकांनीही मनोगत व्यक्त केली .

    अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य दिलीप संकपाळ म्हणाले, 'रक्षाबंधनाच्या सणाचे महत्त्व व पावित्र्य ओळखून गेली अनेक वर्षें महाविद्यालयामध्ये रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याची महाविद्यालयाची परंपरा आहे . केवळ आपल्या नात्यातीलच भाऊ बहिणीची वीण ही घट्ट न करता समाजामध्ये वावरत असताना सौहार्द वातावरण निर्माण करण्यासाठी एक व्यापक अर्थाने रक्षाबंधन सण साजरा करणे आवश्यक आहे . बहिण भावाला राखी बांधून आपल्या रक्षणाची जबाबदारी भावावरती सोपवते . पण आज या रक्षाबंधनाच्या उचित अर्थ घेऊ सबलानी दुर्बलांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर घेण्याची गरज आजच्या काळातही आहे. त्यामुळे ती निभावणे हे अतिशय मोलाचे आहे. हेच या रक्षाबंधनाच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपली वेगवेगळी नाती व जबाबदाऱ्या पेलताना दुर्बलांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावरती घेणे गरजेचे आहे.' असे मत व्यक्त केले.

     स्वागत कु.तेजल कांबळे हिने केले, आभार कु. साक्षी जाधव हिने मानले तर सूत्रसंचालन कु. जिया मुल्ला हिने केले .

     याप्रसंगी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.मनोज कुमार पाटील, प्रा. एम.आर.शिंत्रे प्रा. व्ही. डी. हाक्के, प्रा. श्रीमती एस.एस.केंद्रे, प्रा. श्रीमती एस.जी. धामणेकर, प्रा.व्ही. जी. चव्हाण उपस्थित होते.

    या कार्यक्रमाचे संयोजन वर्गशिक्षक प्राध्यापक अनिल निर्मळे व प्रा.सौ. शोभा फड यांनी केले.


सबलानी दुर्बलांचे रक्षण करणे हाच रक्षाबंधनाचा मुख्य हेतू : उपप्राचार्य दिलीप संकपाळ*
Total Views: 135