बातम्या
गोरगरीबांचे रेशन तात्काळ सुरू करावे ; करवीर शिवसेनेचे बोंब मारो आंदोलन व जोरदार निदर्शने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)..
By nisha patil - 10/8/2026 3:15:54 PM
Share This News:
गोरगरीबांचे रेशन तात्काळ सुरू करावे ; करवीर शिवसेनेचे बोंब मारो आंदोलन व जोरदार निदर्शने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)..
करवीर तालुक्यातील प्रत्येक गावातील गोरगरीबांचे रेशन बंद केले गेले असून ते धान्य बंद केल्यामुळे गोरगरीबांचे बजेट कोलमडले असून रेशन बंद मुळे बऱ्याच खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय झाला असून आपण ज्या कारणासाठी धान्य बंद केले आहे ते म्हणजे तो शासनाचा आय.टी. रिटर्न भरत असल्याच्या कारणामुळे पण सामान्य माणुस हा घर बांधताना व गाडी घेताना त्याला बँकेचे कर्ज काढायला लागते त्या वेळी त्याला आय.टी. रिटर्न भरावाच लागतो. पण हे कारण अगदी चुकीचे आहे. शासनाचा कर भरणारा हा श्रीमंतच असतो अस नाही. आज महाराष्ट्र शासनाने जो काही गोरगरीबांच्या तोंडचा घास काढून घेणेचा डाव केलेला आहे. टपरीवाले, केळी-भाजी विकणारे देखील, दैनंदिन खर्चासाठी कर्जासाठी रिटर्न भरतात, शेत जमीन नाही, अल्पभुधारक आहेत. यांचेही रेशन शासनाने बंद केलेले आहे. जे खरोखरच रेशन पासुन वंचित आहेत त्यांना शासनाने रेशन दिले गेलेच पाहिजे.
पण चालु लोकांचे रेशन बंद करणे हा महाराष्ट्र शासनाने जुलमी कायदा रद्द करावा. ज्या रेशन धारकांचे रेशन बंद झाले आहे त्यांचे त्वरित रेशन चालु करावे. म्हणून आज करवीर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसिलदार कार्यालयाच्या दारात जोरदार निर्देशन करून शासनाचा निषेध करत आहोत. भविष्यात यापेक्षाही मोठे आंदोलन उभे करून बंद झालेल्या रेशन धारकांना शासनाकडून रेशन मिळवून देवू त्यासाठी कायदा हातात घ्यावा लागला तरी घेवू पण त्यांना न्याय मिळवून देवू ही करवीर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका आहे. म्हणून आज आपल्या कार्यालयाच्या दारात जोरदार निदर्शने करून शासनाचा निषेध करण्यात आला..
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की, चुकीचे निकष लावून गोरगरिबांची रेशन बंद का केली अशी विचारणा करून अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी अधिकारी निरुत्तर झाल्याचे पहायला मिळाले..यावेळी शिवसैनिकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून बोंब मारो आंदोलन करण्यात आले परिसर दणानून सोडला..
चुकीचे निकष लावून गोरगरिबांची बंद केलेली रेशन तात्काळ सुरु करावी या मागणीचे निवेदन मा. भालचंद्र यादव, निवासी नायब तहसीलदार करवीर, मा. विलास देसाई, पुरवठा निरीक्षण अधिकारी यांना देण्यात आले..
यावेळी अधिकारी म्हणाले की, आपली मागणी वरती पाठवून यावर लवकरात लवकर कार्यवाही करू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले..
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, शहर प्रमुख विशाल देवकुळे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख हर्षल पाटील, राहुल गिरुले, बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार, वीरेंद्र भोपळे, सचिन नागटिळक, शिवाजी लोहार, दीपक फ्रेमवाला, सुनील पारपाणी, संतोष चौगुले, दत्तात्रय विभुते, कैलास जाधव, वसंत पवार, मनोज कुरळे, दिलीप चव्हाण, अभिजीत गुरव, अजित चव्हाण, आबा जाधव, रामराव पाटील, धनंजय पाटील, बाबुराव पाटील, प्रफुल्ल घोरपडे, अकबर फकीर, कृष्णात तुरुके, अशोक कोळी, साहिल देवळे, मोहन रजपूत, आदी शिवसैनिक, पदाधिकारी तसेच रेशन धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते..
गोरगरीबांचे रेशन तात्काळ सुरू करावे ; करवीर शिवसेनेचे बोंब मारो आंदोलन व जोरदार निदर्शने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)..
|